Goa Crime Danik Gomantak
गोवा

Goa Crime: एकाच दिवशी 2 रशियन नागरिकांचा गोव्यात मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरु

Foreigners Death in Goa: उत्तर आणि दक्षिण गोव्यातून दोन रशियन नागरिकांच्या मृत्यूचा धक्कादायक खुलासा झाला.

Akshata Chhatre

गोवा: गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे अशातच उत्तर आणि दक्षिण गोव्यातून सोमवारी (दि. 4 नोव्हेंबर) रोजी दोन रशियन नागरिकांच्या मृत्यूचा धक्कादायक खुलासा झाला. डेनिस डेटकोव्ह (वय, 47) नावाच्या एका इसमाचा मृतदेह गेस्ट हाऊसमध्ये सापडला.

हा रशियन व्यक्ती शनिवारी गोव्यात आला होता आणि त्याची तब्येत खराब असल्याचे कारण सांगून काही तरी औषधं घेत होता. पूर्ण दिवस डेनिस डेटकोव्हने दरवाजा न उघडल्याने घर मालकिणीला संशय आला आणि तिने दरवाजा जोरजोरात वाजवायला सुरुवात केली, मात्र तरीही आतून काहीच प्रतिसाद आला नाही.

ही घटना काहीशी संशयास्पद वाटल्याने तिने त्वरित काणकोण पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना डेनिस डेटकोव्ह मृत अवस्थेत सापडला. सामुदायिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले आणि सध्या त्याचे मृत शरीर दक्षिण गोव्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले आहे, पुढे याची शवचिकित्सा केली जाईल.

सोमवारीच उत्तर गोव्यातून देखील असाच एक प्रसंग उघडकीस आला. तेमुर त्सेरबाएव (वय,44) नावाच्या इसमाचा मृतदेह त्याच्याच शिवोलीतील भाड्याच्या घरात सापडला.

त्याच्या पत्नीने हणजूण पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो दारूच्या आहारी गेला होता आणि त्याच्यावर उपचार सुरु होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तेमुर त्सेरबाएवच्या पत्नी व मुलीला बाहेरून परतल्यानंतर तो मृतावस्थेत सापडला. या घटनेचा सखोल तपास केला जाईल अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT