Death body of young girl was found in area of Mandovi River Dainik Gomantak
गोवा

कुजलेल्या अवस्थेत वाघुर्मेत आढळला युवतीचा मृतदेह!

झाडीत अडकलेल्या स्थितीतील या युवतीच्या अंगावर निळ्या रंगाची जीन पँट तसेच टी शर्ट आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: म्हादाई नदीत वाघुर्मे येथे अज्ञात युवतीचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह काल संध्याकाळी सापडला. ही आत्महत्या आहे की खून याबाबत सध्या कोणताही माहिती पुढे आली नाही. या प्रकरणामध्या परिसरामध्ये उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

झाडीत अडकलेल्या स्थितीतील या युवतीच्या अंगावर निळ्या रंगाची जीन पँट तसेच टी शर्ट आहे. फोंडा पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला असून शवचिकित्सेसाठी युवतीचा मृतदेह पाठविण्यात आला आहे. आता या अहवालानंतरच युवतीचा मृतदेहाबाबत माहिती मिळेल असे फोंडा पोलिसांनी सांगितले. फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील वाघुर्मे येथे महादई नदीत एका अज्ञात युवतीचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

वाघुर्मे येथे महादयी नदीच्या किनाऱ्यावरील झुडपात हा मृतदेह अडकला होता. संध्याकाळी येथील काही लोक मासेमारीसाठी गळ टाकण्यास गेले असता मृतदेह कुजल्यामुळे दुर्गंधी आल्याने त्यांनी झुडपात पाहिले असता झुडपात अडकलेला मृतदेह त्यांना दिसला त्यानंतर लगेच फोंडा पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी इस्पितळात पाठवला. नदीकिनारी असलेल्या झुडपात मृतदेह अडकला नसता, तर वाहत मांडवी नदीला मिळाला असता.

मयत युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह पाच ते सात दिवसांचा असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे. फोंडा तसेच लगतच्या पोलिस स्थानकाच्या हद्दीत एखादी युवती बेपत्ता असल्याची तक्रारही नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे. फोंडा पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोहन गावडे अधिक तपास करीत आहेत.

पेहरावावरून विद्यार्थिनी असल्याचा संशय

मयत युवतीचे वय अंदाजे वीस ते बावीस वर्षांचे आहे. मात्र, चेहरा ओळखणे शक्य नाही. पेहरावावरून ही युवती विद्यार्थिनी असावी असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या युवतीने आत्महत्या केली की तिला ठार मारले याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अलीकडच्या काळात गुन्हे वाढल्याने नेमका प्रकार काय याबाबत अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, युवतीचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT