Wild Boar Accident Dainik Gomantak
गोवा

Wild Boar Accident: दुचाकीच्या धडकेत रानडुक्कर ठार; काणकोण येथील घटना, चालक जखमी

Accident: काणकोण तालुक्यातील मणे दाबेल येथे शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी एका रानटी डुक्करानं चालत्या मोटारसायकलला धडक दिल्यानं डुक्कराचा जागीच मृत्यू झाला.

Sameer Amunekar

काणकोण: काणकोण तालुक्यातील मणे दाबेल येथे शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी चालत्या दुचाकीला धडक दिल्यानं रानटी डुक्कराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून, त्याच्या वाहनाचंही नुकसान झालं आहे.

अपघात शनिवारी सकाळच्या सुमारास घडला. मोटारसायकलस्वार नेहमीप्रमाणे आपल्या मार्गाने जात असताना अचानक झाडीतून आलेल्या रानडुकराने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे मोटारसायकलस्वार रस्त्यावर कोसळला आणि रानडुक्कर जागीच ठार झाला.

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोटारसायकलस्वाराला मदत केली आणि वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून मृत रानडुक्कराला ताब्यात घेतलं आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी परिसरात वाढत्या वन्यजीव चळवळीबाबत चिंता व्यक्त केली. अलीकडे रानडुकरांचे प्रमाण वाढले असून, हे प्राणी शेतात आणि रस्त्यांवर वारंवार दिसू लागले आहेत. यामुळे शेतकरी आणि वाहनचालक दोघांनाही धोका निर्माण झाला आहे.

वन्यजीवांच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात. या प्रकारच्या घटना भविष्यात टाळण्यासाठी वनविभागाने जंगल आणि मानवी वस्त्यांमधील सीमारेषा स्पष्ट करणे आवश्यक आहे, असं नागरिकांचं मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT