Deadbody of unknown man found in Madgaon Goa Dainik Gomantak
गोवा

मडगावात अनोळखी व्यक्तीच्या खूनामुळे खळबळ

मृतदेह कुणीतरी भिकारी किंवा कामगारांचा असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : मडगाव येथील हॉटेल रविराजनजिक पार्क करुन ठेवलेल्या एका पिकअप गाडीत मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह कुणीतरी भिकारी किंवा कामगारांचा असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मडगावात अशा प्रकारे मृतदेह सापडल्याने परिसरात मात्र खळबळ माजली आहे. (Deadbody of unknown man found in Madgaon Goa)

शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून हत्या झालेल्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी भोसकून टाकले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जखमी अवस्थेत तो चालत या हॉटेलपर्यंत पोहोचून नंतर त्याने जवळ पार्क केलेल्या जीपमध्ये आसरा घेतला. तिथेच तो गतप्राण झाला असावा असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.

दुसरीकडे सांजाव साजरा करण्यासाठी विहिरीत मारलेली उडी डोंगरी नावेली येथील आशिष रॉड्रिग्स या 19 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतली. या धाडसात त्याचा प्राण गेला. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी 4 च्या सुमारास घडली आहे.

डोंगरी नावेली येथे काही युवक सांजाव साजरा करण्यासाठी विहिरीवर आले. या युवकांबरोबर आशिषनेही विहिरीत उडी घेतली. पण तो वर आलाच नसल्याचे समोर आले. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्याचा मृतदेह पाण्यातून वर काढण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT