Deadbody Found in Mayade River Dainik Gomantak
गोवा

नदीत उडी घेतलेल्या इसमाचा मृतदेह अखेर सापडला

मयडे नदीत मंगळवारी उडी घेतल्यापासून सुरु होतं शोधकार्य

दैनिक गोमन्तक

म्हापसा : म्हापशाजवळील मयडे गावात नदीत उडी घेतलेल्या व्यक्तीचा मृतदेह अखेर सापडला आहे. दिगंबर धोंड असं मृत व्यक्तीचं नाव असून काल मंगळवारी दुपारी त्यांनी नदीत उडी घेतल्याची माहिती आहे. आज सकाळी त्यांचा मृतदेह उडी घेतलेल्या ठिकाणापासून जवळच असलेल्या धरणात अडकलेला सापडला आहे. (Deadbody Found in Mayade River News Updates)

नास्नोळा गावातील राहणाऱ्या दिगंबर धोंड या 50 वर्षीय व्यक्तीने काल मंगळवारी मयडे गावातील नदीत उडी घेतली होती. आपलं सामान नदीकिनारी ठेवत त्यांनी नदीमध्ये उडी टाकली होती. काल दुपारपासून शोधकार्य सुरु होतं, मात्र त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. मात्र आज बुधवारी सकाळी उडी घेतलेल्या पुलापासून जवळच असलेल्या धरणात त्यांचा मृतदेह अडकलेला आढळला आहे.

दरम्यान इसमाने नदीत उडी घेतल्याची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अग्निशमन दलाने स्थानिकांच्या साहाय्याने व्यक्तीचा शोध सुरु केला होता. मात्र काल अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. आज बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह धरणाजवळ आढळला असून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या इसमाने आत्महत्या केली की हा घातपात आहे याचा तपास म्हापसा पोलिसांनी सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT