Lady Drown with daughter in canacona Dainik Gomantak
गोवा

काणकोणात बुडालेल्या मातेसह विवाहित कन्येचा मृतदेहही सापडला

आईच्या गळ्यात जाळीचा दोरा सापडल्याने संशय बळावला, पोलीस तपास सुरु

दैनिक गोमन्तक

काणकोण : तामने- लोलये येथील तळीत बुडालेल्या माता आणि विवाहीत कन्येचा मृतदेह अखेर बाहेर काढण्यात यश आलं आहे. घराखाली असलेल्या तळीतून पोलिसांनी दोन्ही मृतदेह हस्तगत केले आहेत. मुलगी अंकिता हिचा मृतदेह रविवारी संध्याकाळी स्थानिकांनी पाण्याबाहेर काढला होता, तर आई माया हिचा मृतदेह रविवारी उत्तररात्री सापडला आहे.

काणकोणच्या (Canacona) तामने-लोलये येथील माया आनंद पागी (52) आणि त्यांची विवाहित कन्या अंकिता प्रकाश कोळगी (26) घराखाली असलेल्या तळीत बुडाल्या होत्या. रविवारी संध्याकाळी स्थानिकांना शोधाशोध करताना अंकिता हिचा मृतदेह तळ्यात पाण्यावर तरंगताना आढळला होता. तिला पाण्याबाहेर काढून स्थानिकांनी प्रथमोपचार करुन तोंडातून पाणी बाहेर काढले. मात्र तिने प्रथमोपचाराला प्रतिसाद दिला नाही. तिला हॉस्पिसिओ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिला मृत घोषित करण्यात आलं.

यानंतर अग्निशामक दलाला (Fire Brigade) घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तिच्या आईचा शोध सुरू करण्यात आला. मात्र उत्तररात्री तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. तिच्या गळ्यात जाळीचा दोरा सापडला होता, त्यामुळे तिने गळफास घेतल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ज्याअर्थी अंकिताचा मृतदेह प्रथम सापडला, त्याअर्थी अंकिता पहिल्यांदा बुडाल्याचा अंदाज पोलिसांनी काढला आहे.

दोन्ही मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी मडगावच्या (Madgaon) हॉस्पिसिओ इस्पितळात पाठवण्यात आले होते. त्यापैकी आई मायाच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी होऊन तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अंकिताच्या पतीचे घर नावेली येथे असून पती परदेशात बोटीवर कामाला आहे. जोपर्यत पती गोव्यात येत नाही, तोपर्यंत मृतदेहाची वैद्यकीय तपासणी स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT