Anjuna Village Dainik Gomantak
गोवा

Anjuna: हणजूण गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ? जलवाहिनीत सापडला मेलेला उंदीर, चप्पल आणि प्लास्टिकच्या पिशव्या

Anjuna Village: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य जलवाहिनीत अशा प्रकारे कचरा आढळून आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Pramod Yadav

Anjuna: उत्तर गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हणजूण गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनमध्ये मृत उंदीर, चप्पल, कचरा आणि प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनमध्ये अशा प्रकारचा कचरा आढळून आल्याने नागिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हणजूण गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनची सफाई सुरु होती. सफाई करत असताना पाईप लाईनमधून मृत उंदीर, चप्पल, कचरा तसेच, प्लास्टीकच्या पिशव्या आढळून आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य जलवाहिनीत अशा प्रकारे कचरा आढळून आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जलवाहिनीत अशाप्रकारे कचरा साठून राहल्याने एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत मृत उंदीर तसेच कचरा सापडणे धक्कादायक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

आठ दिवसांचा अल्टिमेट्म

हणजूण गावाचा पाणी पुरवठा आठ दिवसांत सुरळीत न केल्यास हणजूण वागातोर गाव बंद ठेवण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. दरम्यान, पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जलवाहिनी साफ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT