Dolphin Death Dainik Gomantak
गोवा

Arambol: हरमल किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

हा डॉल्फिन किमान चार दिवसांपूर्वी मृत पावल्याचा अंदाज वन्य प्राणी तात्पुरता निवारा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल येथील किनाऱ्यावर ''डॉल्फिन'' मासा मृतावस्थेत आढळला. पणजीतील वन्य प्राणी तात्पुरता निवारा केंद्राचे कर्मचारी आणि ‘दृष्टी लाईफ सेव्हर’ संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचे दफन केले. शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास 12 फूट लांबीचा डॉल्फिन वाहून हरमल किनाऱ्यावर आला होता.

हा डॉल्फिन किमान चार दिवसांपूर्वी मृत पावल्याचा अंदाज वन्य प्राणी तात्पुरता निवारा केंद्राचे कर्मचारी ज्ञानेश्वर टाककर आणि मेलविन डिसिल्वा यांनी व्यक्त केला. या डॉल्फिनचे आयुर्मान 10 ते 12 वर्ष असावे.

यावेळी ‘दृष्टी’चे कर्मचारी करण तांडेल व इतर सहकाऱ्यांनी मदत केली. निर्जनस्थळी नेऊन डॉल्फिनला मूठमाती दिली. हरमलचे सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांनी याकामी सहकार्य केले. डॉल्फिन मासा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

SCROLL FOR NEXT