Dead Body Found in Mandovi River Dainik Gomantak
गोवा

Goa News: मांडवीत सापडला मालिम जेटीवर काम करणाऱ्या मजुराचा मृतदेह; जावेदचा अद्याप शोध सुरूच..

राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून यामध्ये मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे.

Kavya Powar

Dead Body Found in Mandovi River

राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून यामध्ये मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. काल (ता. 22) जुन्या मांडवी पुलावर एका रेंट-अ-कारच्या धडकेत दुचाकी पुलावरून खाली कोसळली. तेव्हापासून दुचाकी चालक जावेद सडेकर (38, हळदोणे) याचा शोध सुरू आहे. यातच आज मांडवीत एक मृतदेह तरंगताना आढळून आला

सुरुवातीला सदर मृतदेह जावेदचाच असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र सविस्तर तपासानंतर तो मृतदेह मालिम जेटीवर काम करणाऱ्या एका मजुराचा असल्याचे उघड झाले. सुरजीत सहाय असे मृत मजुराचे नाव आहे. हा मजूर मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे हा मृतदेह काल झालेल्या अपघातानंतर शोध सुरू असलेल्या जावेदचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते

मांडवी पुलावरील अपघात कारचालक ओव्हरटेक करत असताना घडला. नदीत बुडालेल्या तरुणाचा थांगपत्ता रात्री उशिरापर्यंत लागला नव्हता. किनारपट्टी पोलिस, तटरक्षक दल, दृष्टी जीवरक्षक आणि पाणबुड्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. पोलिसांनी कारचालक ओडिशा येथील पर्यटक अंकित त्रिपाठी (३०) याला ताब्यात घेतले आहे. एखाद्या चित्रपटातील घटनेप्रमाणे ही घटना घडल्याची

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ankola Road Accident: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! अंकोलाजवळ बस आणि टँकरची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार, पाच जखमी

Rama Kankonkar Assault: 'दोषींना सोडणार नाही...' रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; कठोर कारवाईचे दिले निर्देश

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT