The body of a Kerala student was found drowned in the sea Dainik Gomantak
गोवा

समुद्रात बुडालेल्या केरळच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

सिकेरी समुद्रात शुक्रवारी बेपत्ता झालेला केरळचा विद्यार्थी निर्मल साजू याचा मृतदेह आज सकाळी सापडला.

दैनिक गोमन्तक

कळंगुट : सिकेरी समुद्रात शुक्रवारी बेपत्ता झालेला केरळचा विद्यार्थी निर्मल साजू याचा मृतदेह आज सकाळी सापडला. केरळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट शैक्षणिक सहलीसाठी गोव्यात आला असता शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्यापैकी निर्मल साजू (वय 21) हा विद्यार्थी सिकेरी येथील समुद्रात सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात बुडाला होता.

स्थानिक पोलिस, जीवरक्षक दल तसेच अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे सत्र सुरू होते. मात्र, वादळी वारा आणि पाऊस असल्याने शोध मोहीम काल मध्येच सोडून देण्यात आली होती. शनिवारी सकाळी शोध मोहीम पुन्हा सुरू केली असता सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात जेथे निर्मल साजू याचा तोल जाऊन तो बुडाला होता त्याच ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला.

कळंगुट पोलिसांनी मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिला असून संध्याकाळी उशिरापर्यंत तो त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT