Dudhsagar river Danik Gomantak
गोवा

Dudhsagar नदीत बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह तब्बल 17 दिवसानंतर सापडला

मृतदेह घेऊन कुटुंबीय भोपाळला रवाना झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर स्थित, दूधसागर धबधब्यात (Dudh Sagar Waterfall) 05 सप्टेंबर रोजी एक पर्यटक बुडाल्याची माहिती समोर आली. अनेक दिवसांपासून या बेपत्ता तरूणाचा तपास पोलिस आणि बचाव पथकाच्या माध्यमातून सुरू होता. अखेर तब्बल 17 दिवसानंतर नदीत बुडालेल्या या पर्यटकाचा मृतदेह कुळे पोलिसांना सापडला आहे.

अर्पीत शुक्ला (रा. भोपाळ) असे या बेपत्ता तरूणाचे नाव आहे. अर्पीत शुक्लाचा मृतदेह कुळे पोलिसांना सोपविण्यात आला असून, मृतदेह घेऊन कुटुंबीय भोपाळला रवाना झाले आहेत.

दूधसागर नदीमध्ये बुडालेल्या अर्पित शुक्ला याच्या मृतदेहाची गोमेकॉत उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 05 सप्टेंबर रोजी अर्पित शुक्ला दूधसागर नदीत बुडाला होता. त्याचा मृतदेह 22 रोजी मिळाला. आज शवचिकित्सा झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय मृतदेह भोपाळला विमानाने घेऊन गेले आहेत. अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक अजय धुरी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT