Dead Body Found at Ambaulim | Crime News  Dainik Gomantak
गोवा

Dead Body Found at Ambaulim: आंबावलीत आढळला 41 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; पोलीस तपास सुरू

केपे तालुक्यातील आंबावली येथे पोलिसांना 41 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kavya Powar

Dead Body Found at Ambaulim: कोपेलाभाट आंबावली येथील सेबेस्तीयाव फेर्नांडिस (41) हा युवक कालपासून बेपत्ता होता त्याचा मृतदेह आज सकाळी भाट केपे येथील कुशावती नदीच्या बंधाऱ्यात सापडला असून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथे जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेबेस्तीयाव फेर्नांडिस हा युवक काल संध्याकाळपासून बेपत्ता होता. फेर्नांडिस हा आपल्या घरी एकटाच राहत होता काल त्याला स्कूटर घेऊन जात असताना काही लोकांनी पाहिले होते त्यानुसार ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

आज सकाळी तो घेऊन आलेली स्कूटर कुशावती बंधाऱ्याजवळ उभी असल्याचे काहींनी पाहिले असता त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचे त्याठिकाणी चप्पल दिसून आले काही अंतरावर पुढे जाऊन पाहिले असता पाण्यात त्याचा मृतदेह असल्याचे दिसून आल्याने कुडचडे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशामक दलाच्या सहकार्याने फेर्नांडिस याचा मृतदेह बाहेर काडून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक वेरोनिका फेर्नांडिस यांनी सांगितले. घटनेचा पंचनामा केपे पोलिसांनी केला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

SCROLL FOR NEXT