Dayanand Mandrekar Resigns Dainik Gomantak
गोवा

Dayanand Mandrekar Resigns: स्‍वकियांच्या छळामुळेच महामंडळाचा राजीनामा दिला, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Dayanand Mandrekar Resigns News: गेल्‍या ४० वर्षांपासून मी भाजपमध्‍ये काम करत आहे. परंतु, पक्षातीलच काही लोकांकडून माझी छळवणूक सुरू आहे. त्‍यामुळेच मी महामंडळाच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गेल्‍या ४० वर्षांपासून मी भाजपमध्‍ये काम करत आहे. परंतु, पक्षातीलच काही लोकांकडून माझी छळवणूक सुरू आहे. त्‍यामुळेच मी महामंडळाच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला. येत्‍या विधानसभा निवडणुकीबाबत शिवोलीतील कार्यकर्ते जो निर्णय घेतील, त्‍यानुसार मी पुढे जाईन, असे माजी मंत्री तथा शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी रविवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

दिवाळीनिमित्त शिवोलीत लावलेले माझे बॅनर्स त्‍यांनी हटवले. एससी, ओबीसी वित्त आणि व्‍यवस्‍थापन महामंडळाचा अध्‍यक्ष या नात्‍याने काम करत असतानाही त्‍यांनी अडथळे आणले. याची माहिती मी भाजपच्‍या स्‍थानिक वरिष्‍ठ नेत्‍याला तीन महिन्‍यांपूर्वी दिली होती. तरीही त्‍यावर तोडगा न निघाल्‍याने मला हे पाऊल उचलावे लागले.

आत घेतात, बाहेर पाठवतात!

माजी मुख्‍यमंत्री लक्ष्‍मीकांत पार्सेकर यांना पक्षाने पुन्‍हा प्रवेश दिला आहे. पण, वरिष्‍ठ नेते असतानाही पक्ष तुमच्‍याबाबतच तसा का वागत आहे? असा प्रश्‍‍न पत्रकारांनी केला असता, पक्षातील नेत्‍यांचे तसेच आहे. ते काहींना आत घेतात आणि काहींना बाहेर ठेवतात, असे मांद्रेकर म्‍हणाले. मी अजूनही पक्षातून बाहेर पडलेलो नाही. पुढील राजकीय वाटचालीबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. चारवेळा मला निवडून दिलेले कार्यकर्तेच माझ्‍याबाबत योग्‍य तो निर्णय घेतील, असेही त्‍यांनी नमूद केले.

पक्षश्रेष्‍ठीच निर्णय घेतील : दामू

दयानंद मांद्रेकर यांची ज्‍येष्‍ठता, त्‍यांचे पक्षाशी असलेले नाते तसेच आमच्‍याशी असलेले ऋणानुबंध लक्षात घेऊन त्‍यांचे म्‍हणणे मी पक्षश्रेष्‍ठींना कळविले आहे. त्‍यावर पक्षश्रेष्‍ठीच निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप (BJP) प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birsa Munda Jayanti 2026: आज बलिदानाची नव्हे, तर परस्पर सहकार्याची गरज; बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सावंतांचे आवाहन

Daily Horoscope: धनलाभाचा दिवस! सूर्य गोचर आणि शुभ योगांमुळे 'या' राशींचे उजळणार नशीब; सोमवार ठरणार खास

Viral Video: मंचावरुन माइक फेकला अन् राडा घातला! काँग्रेस आमदाराचा हाय-व्होल्टेज ड्रामा; CM ला दिलं थेट चॅलेंज

Hafiz Saeed And Masood Azhar: हाफिज सईदला लाहोरमधून रावळपिंडीला, तर मसूद अजहरला सिंधमध्ये केलं शिफ्ट; पाकड्यांना 'ऑपरेशन सिंदूर'ची धास्ती

T20 Cricket: गोव्याच्या फलंदाजांचा सूर हरपला; विदर्भाची 7 विकेट्सनी सहज बाजी

SCROLL FOR NEXT