Aarti Hamal Dainik Gomantak
गोवा

Goa: ओशो केंद्रात शिबिरासाठी गोव्यात आली अन् बेपत्ता झाली, नेपाळमधील महापौरांची कन्या अखेर सापडली

Mandrem Goa: युवती नेपाळमधील धानगाधीच्या महापौरांची कन्या असल्याचे समोर आले आहे.

Pramod Yadav

Mandrem Goa

ओशोंच्या योग आणि ध्यानधारणा शिबिरासाठी गोव्यातून बेपत्ता झालेली नेपाळची युवती अखेर सापडली आहे. आरती हामल असे नाव असलेली ही युवती नेपाळमधील धानगाधीच्या महापौरांची कन्या असल्याचे समोर आले आहे.

आरती गोपाल हामल (36, रा. नेपाळ) असे या युवतीचे नाव आहे. आरती मंगळवारी (दि.26) मांद्रे येथील एका रिसॉर्टमधून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दाखल केली होती. आरती ओशोंच्या योग आणि ध्यानधारणा शिबिरासाठी गोव्यात आली होती.

सोमवारपासून तिच्याशी संपर्क होत नसल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी मांद्रे पोलिसांत दाखल केली होती. आश्वे-मांद्रे येथे ती शेवटची दिसली होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

दरम्यान, आरती हामल मंगळवारी रात्री शिवोली येथे तिच्या मैत्रिणीसोबत आढळून आली. पेडण्यातील ओशो केंद्रात ती 25 मार्च रोजी ध्यानधारणा शिबिरासाठी आली होती. बाहेर पडल्यानंतर तिने मोबाईल केंद्रातच ठेवल्याने तिच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता, त्यामुळे चिंतेत असलेल्या कुटुंबियांनी मांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

Ananta Chaturdashi: अनंताच्या धाग्यात गुंफलेली गोव्याची परंपरा

सॉफ्टवेअरच सर्वेसर्वा?- संपादकीय

SCROLL FOR NEXT