Datta Jayanti

 

Dainik Gomantak 

गोवा

मोरगाव तालुक्यातील विविध मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी

सकाळ ते रात्रीपर्यंत मंदिरात विविध धार्मिक विधी संपन्न झाले.

दैनिक गोमन्तक

वास्को: दत्त जयंती उत्सव मोरगाव तालुक्यातील विविध मंदिरात उत्साहात तसे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळ ते रात्रीपर्यंत मंदिरात विविध धार्मिक विधी संपन्न झाले.

आज हिंदूंचा (Hindu) मुख्य सण दत्त जयंती (Datta Jayanti) उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून मंदिरात (Temple) पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने धार्मिक विधी संपन्न झाल्या. दरम्यान मोरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी ठाणे येथील श्री दत्त मंदिर, गाळींत बोगमाळो येथील दत्त मंदिर, वास्को येथील दत्तमंदिरात, ओरूले बेलाबाय येथील दत्तवाडी संस्थानात आज सकाळपासून दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक विधी झाल्या. तर नंतर दुपारी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. दरम्यान संध्याकाळच्या सत्रात ५ वाजता सर्व ठिकाणी दत्त जन्म पाळणा झाला.

यावेळी दत्त महाराजांना पाळण्यात घालून पाळणा गीत म्हणून दत्त जन्म साजरा केला. नंतर आरती तीर्थप्रसाद तसेच भजनाचा कार्यक्रम, काही ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम झाला. नंतर रात्री श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. दत्तवाडी आरूले येथे रात्री श्रींची मंदिराभोवती पालखी मिरवणूक दिंडी सहीत, तसेच महिलांच्या (Women) दिवत्सवाने काढण्यात आली. नंतर ओटी भरणा झाल्यानंतर आरती तीर्थप्रसाद व पावणीचा कार्यक्रम झाला व संपूर्ण दिवसाच्या उत्सवाची सांगता करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT