Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: ‘डार्क वेब’ तस्‍करीचा संबंध थेट गोव्याशी

राज्यातील एका तरुणासह सहाजणांना अटक; पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs Case नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) डार्क वेबद्वारे देशभरात ड्रग्सचे रॅकेट चालविणाऱ्या टोळीला अटक केली आहे. पथकाने देशभर छापेमारी करत गोव्यातील तरुणासह 6 जणांना अटक केली.

दिल्लीतील नोयडा येथे खासगी विद्यापीठात शिकणाऱ्या गोव्यातील तरुणाला अटक झाल्यानंतर या रॅकेटचा आज पर्दाफाश झाला आहे. डार्कवेब ड्रग्स तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे गोव्यापर्यंतही पोहोचल्याने पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले आहे.

अटक केलेल्यांमध्ये दिल्लीतील तरुणीसह गोवा, केरळ, नोयडा, उत्तर प्रदेशातील संशयिताचा समावेश आहे. त्यांच्याकडून सुमारे 15 हजार एलएसडी ब्लॉट्स आणि 2.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईवेळी एनसीबीने दिल्लीतील एका तरुणीला ताब्यात घेतले. मात्र, तिच्याकडे ड्रग्स सापडला नसला तरी तिने दिलेल्या माहितीच्या आधारे तिच्या साथीदाराला जयपूर (राजस्थान) येथून अटक झाली.

त्याच्याकडे 9006 एलएसडी ब्लॉट्स व 2.23 किलो गांजा मिळाला. हा साठा तो पिंपरी-चिंचवड येथे पाठवणार होता.

सोशल मीडियाचा वापर करून ही ड्रग्स तस्करी होते. डार्क वेबद्वारे कुरियर व टपालमार्फत होणाऱ्या अत्यंत गोपनीय तस्करीचा परिपूर्ण माहिती एनसीबीच्या विशेष पथकाने मिळवली.

त्यातून नोयडा येथे एका खासगी विद्यापीठात शिकत असलेल्या गोव्यातील तरुणाच्या कारवायांवर नजर ठेवण्यात आली. त्याला ताब्यात घेतल्यावर एलएसडी ड्रग्सचा साठा ‘विक्र’ या नावाने मेसेज करून मागविला होता. काश्‍मीर येथील एका ग्राहकाला तो पाठवणार होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT