Danielle McLaughlin Murder Case:  Dainik Gomantak
गोवा

Danielle McLaughlin Murder Case: आरोपी विकट भगतची जामिन याचिका हायकोर्टाने फेटाळली

2017 मध्ये काणकोण येथे बलात्कार करून झाला होता खून

Akshay Nirmale

Danielle McLaughlin Murder Case: ब्रिटिश-आयरिश पर्यटक तरूणी डॅनिएल मॅक्लॉफिन हिचा 2017 मध्ये गोव्यातील काणकोण येथे बलात्कार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी गोवा पोलिसांनी विकट भगत याला अटक केली होती.

दरम्यान, भगत याने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. तथापि, हायकोर्टाने सोमवारी १७ जुलै रोजी त्याची जामिन याचिका फेटाळली आहे.

डॅनिएल, आयर्लंडच्या बुंकराना येथील असून, मार्च 2017 मध्ये गोव्यातील काणकोण येथील सुट्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या एका निर्जन ठिकाणी ती मृतावस्थेत आढळून आली होती. तिचे वय तेव्हा 28 वर्षे होते.

बलात्कार करून खून करण्यापूर्वी तिला बाटलीने मारहाण करण्यात आली होती. ती गोव्यात योगाचे प्रशिक्षण घेणार होती. तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी काणकोण बीचजवळ होळीच्या पार्टीत ती सहभागी झाली होती.

भगत याच्याविरोधात मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात पाच वर्षांपासून खटला सुरू असून आत्तापर्यंत 200 सुनावणी झाल्या आहेत.

डॅनिएलची आई अँड्रिया ब्रॅनिगन यांनी खटल्याला झालेल्या विलंबामुळे आरोपी पुन्हा जामिनासाठी अर्ज करेल. आरोपीला मुक्त करण्याचा विचार त्रासदायक आहे, अशी भीती व्यक्त केली होती.

ब्रिटिश तसेच आयर्लंडच्या उच्च अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन हा खटला वेगाने चालवावा, आणि डॅनियलला न्याय द्यावा, अशई विनंती केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT