Honda IDC Road Dainik Gomantak
गोवा

Honda IDC: होंडा ‘आयडीसी’मधील रस्ते वाहतुकीस धोकादायक; प्रशासनाचे दुर्लक्ष

Honda IDC Road: पथदीप पेटत नसल्याने काळोखाचे साम्राज्य; कामगारवर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न

गोमन्तक डिजिटल टीम

पिसुर्ले: होंडा पंचायत क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीमधील संपूर्ण रस्ते खराब झाले असून, वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. यामुळे औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे गेल्या कित्येक दिवसांपासून या परिसरातील रात्रीच्या वेळी एकही पथदीप पेटत नसल्याने तेथे काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कामगारवर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य सरकार औद्योगिक धोरण आखण्यासाठी विविध उपाययोजना करत असते; परंतु यासाठी निर्माण करून ठेवलेल्या औद्योगिक वसाहतीत मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने तेथे अनेक स्वरूपाच्या साधनसुविधांचा अभाव भासत आहे, त्यामुळे उद्योजक तसेच येथे काम करणाऱ्या कामगारवर्गाला मात्र बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने बऱ्याच ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे बऱ्याच वेळा वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT