Lantana camara Ghaneri
Lantana camara Ghaneri  Dainik Gomantak
गोवा

Lantana Camara: सावधान : आक्रमक, घातक ‘घाणेरी’ वनस्पती फैलावतेय

सुभाष महाले

घाणेरी (तानतानी) ही आक्रमक वनस्पती राज्यासह देशभर आणि जगभर फैलावत आहे. या आक्रमक वनस्पतीने उष्ण कटिबंध देशांतील सुमारे २२ टक्के जमिनीवर अतिक्रमण केले आहे.

येणाऱ्या काळात ही वनस्पती या राष्‍ट्रांमधील ६६ टक्के जमीन व्यापण्याची शक्यता आहे असे एका अभ्यासातून स्‍पष्‍ट झाले आहे. दरम्‍यान, गोव्‍यातही रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागेत ही आक्रमक वनस्‍पती वाढलेली दिसते.

राज्‍यातील काही रोपवाटिकांमध्ये या वनस्पतीची रोपे विक्रीसाठी ठेवलेली दिसतात. देशातही ही वनसस्‍पती झपाट्याने वाढत आहे. जैवविविधतेसाठी ती घातक ठरत आहे.

यासंदर्भात वन्यजीव इन्स्टिट्यूटचे वैज्ञानिक निनाद अविनाश मुंगी, ओमार कुरेशी आणि इन्स्टिट्यूटचे माजी डीन वाय. व्‍ही. झाल्हा यांनी अभ्यास केला आहे.

याबाबत एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने माहिती प्रसिद्ध केली होती. त्याची दखल गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी घेऊन वेगवेगळ्या जैवविविधता समित्‍यांना सतर्क केले आहे.

फळे म्‍हणजे ‘कावळ्याचे डोळे’

घाणेरी या वनस्पतीच्या १५६ प्रजाती आहेत. वेगवेगळ्या रंगांची फुले या वनस्पतीला फुलत असतात. सदर वनस्‍पतीला फळेही येतात. पिकल्या नंतर ती काळसर बनतात.

स्थानिक भाषेत त्यांना ‘कावळ्याचे डोळे’ म्हणतात. ही वनस्पती टॉक्सिक आहे. तिच्‍या पाने, फुले व फळांमुळे उलटी, जुलाब, श्वसनाचे त्रास तसेच यकृताचे त्रास होऊ शकतात. त्‍यामुळे ही वनस्‍पती आक्रमक तसेच घातकही आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

Goa News : समान नागरी कायदाप्रश्‍नी मोदींकडून गोव्याचे कौतुक

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Ponda News : ८४ रोजंदारी कामगारांचा पगार देणार; फोंडा पालिका बैठकीत निर्णय

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये जमावाकडून 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या, दूतावासाकडे जीवाची भीक मागितली पण...

SCROLL FOR NEXT