Damu Naik, Narendra Modi, B L Santosh  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून 'दामूं'चा दिल्ली दौरा, संतोष यांच्याशी चर्चा; तपशील मात्र गुलदस्त्यात

Damu Naik Delhi Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून दामू हे काल दिल्लीला गेले होते. संसद भवनात त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.

Sameer Panditrao

पणजी: भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आज दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची भेट घेतली. त्यांनी दोन महिन्यांत केलेल्या संघटनात्मक कामाचा तसेच गोवा व सरकार याविषयीचे अहवाल त्यांना सादर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून दामू हे काल दिल्लीला गेले होते. संसद भवनात त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीबाबत दामू यांनी सांगितले, की प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर केलेली कामे आणि पक्षाची सरकारकडून असलेली अपेक्षा या विषयी या भेटीत सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली.

त्यानी केलेले मार्गदर्शन पक्षाचे राज्यात काम पुढे नेण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. मतांची टक्केवारी ३६ टक्क्यांवरून ५० टक्के करण्याचे लक्ष्यही या भेटीदरम्यान निश्चित करण्यात आले. दामू यांनी आज संतोष यांच्याशी चर्चा केली. राज्यात संतोष आले असताना दामू यांनी त्यांच्याकडे अहवाल सादर केला होता.

त्या अनुषंगानेही चर्चा झाली. संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याचे त्यानी नमूद केले. मंत्रिमंडळ फेरबदल किंवा कोणत्या मंत्र्याच्या कामगिरीबाबत या भेटीदरम्यान चर्चा झाली का याविषयी वारंवार विचारणा करूनही दामू यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. दामू यांनी काल रात्री व आज दुपारी पक्षाच्या अन्य महत्वाच्या नेत्यांशी चर्चा केली. आज सायंकाळी सहा वाजता राज्यात पोचल्यावर ते तडक पक्षाच्या मेळाव्यासाठी कळंगुट येथे रवाना झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT