Goa Assembly election 2027 BJP candidates Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: 'पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून लढणार'; दामू नाईकांच्या उमेदवारीबाबत चर्चांना पूर्णविराम

Damu Naik Election Statement: दामू नाईक फातोर्ड्यातून नव्हे, तर शिरोड्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता, या केवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: भाजपची मजबूत संघटना असून, कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणूक जिंकू. काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे माझ्या उमेदवारीबाबत खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केली.

दामू नाईक फातोर्ड्यातून नव्हे, तर शिरोड्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता, या केवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. मी भाजपचा निष्ठावान सैनिक असून, पक्षाच्या विजयासाठी कठोर परिश्रम करेन. पक्षाने आदेश दिल्यास सांगेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, फातोर्डा येथे पोस्टर्स आणि बॅनर्स फाडण्यात आल्याच्या प्रकारावर नाईक यांनी विरोधकांवर निशाणा साधला. एका ठरावीक व्यक्तीला आणि त्याच्या ‘चमच्यांना’ माझी भीती वाटू लागल्यानेच त्यांनी माझे बॅनर्स फाडले, असा आरोप त्यांनी केला.

नगरपालिकेचा आवश्यक कर भरून आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बॅनर्स लावले होते. मात्र, समाजकंटकांनी ते जाणीवपूर्वक खराब केले. बॅनर्स फाडले म्हणून लोकांच्या मनातील माझे स्थान कुणीही पुसू शकणार नाही, असे नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Philippines Plane Crash: फिलिपाईन्समध्ये मोठी दुर्घटना! परदेशी प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश; बचावकार्य सुरू

Bison In Goa: लाखेरेत गव्यांचा धुमाकूळ, बागायती पिकांची नासधूस; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

इफ्फीत चित्रपट तंत्रज्ञानातील नवउद्योजकांना संधी, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून वेव्हएक्स स्टार्टअप दालनासाठी अर्ज आमंत्रित

Compressed Biogas Policy: कचऱ्यातून इंधननिर्मितीला मिळाला हिरवा कंदील, कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर; कोट्यवधींचे अनुदान; पाच प्रकल्प उभारणार

Goa Political Alliances: गोव्यात युतीचे चाक रुतले, निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले! भाजपसह विरोधी पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT