Damu Naik On ZP Election Dainik Gomantak
गोवा

Damu Naik: 118 सभा, दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींवर स्‍पष्‍ट बहुमत; 'दामू नाईकां'च्‍या प्रदेशाध्‍यक्षपदाला एक वर्ष पूर्ण

Damu Naik Goa Bjp: माजी प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा कार्यकाळ संपल्‍यानंतर भाजपने त्‍यांची राज्‍यसभेच्‍या खासदारपदी वर्णी लावली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : भाजप प्रदेशाध्‍यक्ष म्‍हणून दामू नाईक हे रविवारी (ता. १८ जानेवारी) एक वर्ष पूर्ण करत आहेत. गतवर्षी १८ जानेवारी रोजी त्‍यांची प्रदेशाध्‍यक्षपदी बिनविरोध निवड करण्‍यात आली होती. या वर्षभराच्‍या काळात जिल्‍हा पंचायत निवडणुकीत दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींवर स्‍पष्‍ट बहुमत मिळवत आपल्‍या नेतृत्‍वाचा त्‍यांनी ठसा उमटवला.

माजी प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा कार्यकाळ संपल्‍यानंतर भाजपने त्‍यांची राज्‍यसभेच्‍या खासदारपदी वर्णी लावली. त्‍यानंतर प्रदेशाध्‍यक्षपदाची धुरा कुणाच्‍या खांद्यावर येणार, याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून होते.

या पदाच्या शर्यतीत दामू नाईक यांच्यासह माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, बाबू कवळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे आणि वरिष्ठ नेते दत्ता खोलकर असे सात जण होते. त्यातून पक्षाने दामू नाईक यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब करत त्‍यांची बिनविरोध निवड केली होती.

जिल्हा पंचायत निवडणुकीत घेतल्या ११८ सभा

जिल्हा पंचायत निवडणुकीत दामूंनी भाजप उमेदवारांचा वादळी प्रचार केला. त्य‍ासाठी राज्यभर त्यांनी ११८ सभा घेतल्या. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासह कोपरा बैठकांनाही उपस्थिती लावली. त्यांच्या सभांना नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT