The unseasonal rains that fell on Sunday morning caused damage to the spinach and red vegetables. Dainik Gomantak
गोवा

वादळी पावसामुळे ताळगावात झाले भाजीचे नुकसान...

फटका : लालभाजी, पालक, मिरची, चिटकी पाण्यात

दैनिक गोमन्तक

पणजी: मध्यरात्री सुमारे तीन वाजता झालेल्‍या वादळी पावसामुळे राज्‍यातील कृषी उत्पादनांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणची झाडे उन्‍मळून पडली तर बहुतांश ठिकाणचे कापणीला आलेले भाजी पीक वाहून गेले.

ताळगाव येथील वृद्ध शेतकरी चालू मुरगावकर यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आम्‍ही येथे पालक, भेंडी, मिरजी, चिटकी आदींचे पीक घेतले होते. येत्‍या दोन दिवसांत ही भाजी काढणार होतो. पण अचानकपणे झालेल्‍या मुसळधार पावसामुळे आमचे सर्व पीक पाण्याखाली गेले. तसेच येथील तरुण शेतकरी रोहिदास गावस यांनी सांगितले की, आम्हीही भाजीचेच पीक घेतले होते. पण अवकाळी पावसामुळे माझे अंदाजे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे.

आजच्‍या पावसाने आमचे मोठे नुकसान केले. इतके नुकसान होऊनही सरकार पातळीवर एकाही यंत्रणेने याची दखल घेतली नसल्‍याचे श्री. मुरगावकर यांनी सांगितले. पंचायत असो किंवा स्‍थानिक आमदार आमची साधी चौकशीही करायला आलेले नाहीत. सदरचे पीक आम्‍ही स्‍वखर्चातून केले होते. यासाठी सरकारने किंवा पंचायतीने आम्‍हाला काहीही मदत केलेली नाही, असे श्री. गावस यांनी यावेळी सांगितले. ताळगाव परिसरातील संपूर्ण शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने याची दखल घ्यावी, असे आवाहन श्री. मुरगावकर यांनी यावेळी केले.

विजेचा लपंडाव

रविवारी मध्यरात्री संपूर्ण राज्‍यात वादळी पाऊस झाला. विजांची कडकडाट आणि वादळी वारा यामुळे राजधानी पणजीत काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. सखल भागात पाणी साठले. अनेक ठिकाणी वीज गूल झाल्‍याने उकाड्याने हैराण झालेल्‍या नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT