Damage to orchards in Amdai-Sange Dainik Gomantak
गोवा

Goa flood: आमडई-सांगेतील पुराच्या तडाख्यात बागायतींची मोठी हानी

सांगेत आलेल्या पुराच्या तडाख्यात अनेकांच्या घरांची, नासधूस झाली असून आमडई सांगे येथील प्रीती गावकर, सूर्याजी गावकर, व मथुरे गावकर यांच्या बागायतींची हानी झाली.

Bhushan Aroskar

सांगे: सांगेत आलेल्या पुराच्या तडाख्यात अनेकांच्या घरांची, बागायतींची नासधूस (Damage to orchards) झालेली असून आमडई सांगे (Amdai-Sange) येथील प्रीती गावकर, सूर्याजी गावकर, व मथुरे गावकर यांच्या बागायतींची हानी झाली आहे. पुराच्या तडाख्यात मोठ मोठी झाडे, ओंडके, पाला पाचोळा वाहून आल्याने बागायती मधील पोफळी, कवाथे, केळींची हानी झाली. तर प्रीती गावकर हिच्या बागायतींमधील पम्पहाऊस पुराच्या तडाख्यात जमीनदोस्त होऊन सामान वाहून गेले. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या २५-३० वर्षात अश्या प्रकारे पुराचे पाणी कधीच आले नव्हते. या पुराने काही वेळातच होत्याचे नव्हते केले. बागायती (orchards) साफ करण्यासाठीही खर्च करावा लागणार आहे. सरकारकडून (Goverment) मिळणारी नुकसान भरपाई ही नगण्य असते. मात्र, यावेळी योग्य अशी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सूर्याजी गावकर यांनी केली आहे.

आमडई गावात आलेला पूर हा उगे नदीचा (Uge river) आहे. नदीचे मूळ उगमस्थान कर्नाटकात (Krnataka) असल्याने कर्नाटक सरकारने कद्रा, कोडसळली, गणेशगुडी धरणातून (Dam) पाण्याचा विसर्ग केल्याने हे पाणी उगे नदीत जमा झाले. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होवून पुर आला असावा असा म्हटले जात आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली असतानाही पाणी वाढत गेले. शिवाय पाण्याचा प्रवाह हा पुराच्या प्रवाहासारखा नसून अचानक आलेल्या पाण्याचा लोट असावा. त्यामुळेच पाणी झाडे पेडे उन्मळून पडली व हे सर्व उगे नदीत समाविष्ट होत संगमेश्वर (Sangmaneshwar) नदीला जाऊन मिळाल्याने मीराबाग, धडे गाव पाण्याखाली गेले. मात्र, त्या गावात साळावलीचे पाणी सोडल्याची जोरदार चर्चा सुरु होती. शुक्रवारी (ता. २३) आलेल्या पुरात सूर्याजी गावकर यांच्या बागायतीतील पोफळी, कवाथे यांची मोठी नुकसानी झाली आहे. मोठमोठी झाडे त्यांच्या बागायतीत येऊन पडल्याने पोफळी मोडून पडल्या आहेत. अनेक ठिकाणी पुराचे पाणी ओसरल्यानंतर झालेली नुकसानी दिसून आली. सरकारने तातडीने सर्व्हेक्षण करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT