Dainik Gomantak Whatsapp Channel: नुकतेच व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी एक नवे फीचर लॉंच केले आहे. व्हॉट्सअॅप चॅनल असे नवे अपडेट आता व्हॉट्सअॅपवर पाहायला मिळत आहे. हे वन-वे ब्रॉडकास्ट टूल असून याद्वारे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्ती किंवा संस्थाना फॉलो करू शकता.
गोव्यातील अग्रगण्य माध्यम समूह 'दै. गोमन्तक'ही आता वाचकांसाठी व्हॉट्सअॅप चॅनलद्वारे उपलब्ध झाले आहे.
दैनिक गोमन्तक हे गोव्यातील विश्वासार्ह वृत्तपत्र असून मागील 61 वर्षे ते वाचकांना दर्जेदार आणि अचूक बातम्या पुरवत आहे. बदलत्या काळासोबत वृत्तपत्राला डिजिटल आणि टीव्हीची जोड मिळाली. यानंतर आता 24 तास आपला सोबती असलेल्या फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून गोमन्तक वाचकांपर्यंत ताज्या बातम्या पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहे.
गोव्यातील ताज्या आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी वाचकांनी गोमन्तकच्या व्हॉट्सअॅप चॅनलला फॉलो करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स कराव्या लागतील.
व्हॉट्सअॅप नुकतेच अपडेट झाल्यानंतर तुम्हाला Status च्या ऐवजी आता Updates असा पर्याय दिसेल.
तिथे Find Channel असा पर्याय तुम्हाला दिसेल.
तिथे Dainik Gomantak TV असे टाईप केल्यावर तुम्हाला गोमन्तकचे व्हॉट्सअॅप चॅनल दिसेल.
त्यावर जाऊन Follow वर क्लिक करा.
चॅनेलला फॉलो केल्यानंतर Updates मध्ये Status च्या खाली तुम्हाला चॅनेलचे नाव दिसेल
टीप: व्हॉट्सअॅपचे हे अपडेट नुकतेच आल्याने अनेकांना हे फिचर दिसायला वेळ लागू शकतो. अशावेळी, तुम्हाला सुरुवातीला कोणत्याही चॅनेलला लिंकद्वारे फॉलो करावे लागेल.
गोमन्तक चॅनेल फॉलो करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
गोमन्तकच्या किंवा कोणत्याही चॅनेलला फॉलो केल्यानंतर तुमचा नंबर इतर कोणत्याही फॉलोवरला दिसणार नाही.
गोमन्तक चॅनेलला फॉलो केल्यानंतर तुम्हाला गोव्यातील प्रत्येक ब्रेकिंग बातमी तुमच्या फोनवरच सहज उपलब्ध होणार आहे.
गोव्यातील राजकीय, सांस्कृतिक, स्थानिक सर्व घडामोडींची माहिती मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.