Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: राज्यात कुठे, किती पाऊस झाला? पुढील 3 दिवसांसाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज; वाचा

दैनिक गोमन्तक

जूनमध्ये जरा उशिराच सुरू झालेल्या पावसाने जुलैमध्ये थैमान घालायला सुरुवात केली आहे. यामुळे राजधानी पणजीसह इतर शहरांमध्येही रस्ते तुंबण्याच्या तसेच ठिकठिकाणी पडझडीच्या घटना वाढल्या आहेत. मागील 24 तासात राज्यभरात कुठे किती पाऊस झाला याची माहिती हवामान खाते देत असते.

24 तासात कुठे, किती पाऊस?

  • म्हापसा : 28 मिमी

  • पेडणे : 53.8 मिमी

  • फोंडा : 45 मिमी

  • पणजी : 17.4 मिमी

  • वेल्हा : 35.9 मिमी

  • साखळी : 44.2 मिमी

  • वाळपाई : 69.5 मिमी

  • काणकोण : 78.2 मिमी

  • दाबोळी : 12.6 मिमी

  • मडगाव : 28 मिमी

  • मुरगाव : 18.3 मिमी

  • केपे : 40.2 मिमी

  • सांगे : 39 मिमी

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 दिवसात संततधार सुरूच राहणार असली तरी पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पावसामुळे होणाऱ्या पडझडीच्या घटना मात्र सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे शनिवारी चार ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्याची नोंद मडगाव अग्निशमन केंद्रात झाल्याची माहिती मडगाव अग्निशमन केंद्राचे अधिकारी हर्क्युलानो गिल सोझा यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT