Goa CM Dr. Pramod Sawant | Dabolim Airport  Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळी घोस्ट विमानतळ होणार नाही; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सभागृहात आश्वासन

Goa Assembly Monsoon Session 2024: दाबोळीवरुन गेल्याकाही दिवसांत कतार, इंडिगो, ओमान, एअरफ्लोट, एअर अरेबिया यासारख्या फ्लाईट्स मोपावर स्थलांतरीत झाल्याचे आलेमाव यांनी सांगितले.

Pramod Yadav

पणजी: दक्षिण गोव्यातील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ घोस्ट विमानतळ होणार नाही. सरकार याबाबत जागृक असून, विमानतळ भविष्यात देखील सुरुच राहिल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात सांगितले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह विरोधी बाकावरील आमदारांनी मांडलेल्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दाबोळी विमानतळाबाबत बोलताना, येत्या काही दिवसात दाबोळी घोस्ट विमानतळ होण्याची भीती व्यक्त केली. दाबोळीवरुन गेल्याकाही दिवसांत कतार, इंडिगो, ओमान, एअरफ्लोट, एअर अरेबिया यासारख्या फ्लाईट्स मोपावर स्थलांतरीत झाल्याचे आलेमाव यांनी सांगितले.

यासह विरियातो यांनी संसदेत दिलेल्या उत्तराचा भाग देखील आलेमाव यांनी यावेळी वाचून दाखवत, केंद्रीय मंत्रायल देखील दाबोळीवरुन स्थलांतर होणार फ्लाईट्सबाबत हात झटकत असल्याचे म्हटले.

याशिवाय आमदार विजय सरदेसाई, एल्टन डिकॉस्ता, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नीलेश काब्राल यांच्यासह दाबोळीबाबत मत मांडले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत उत्तर देताना दाबोळी घोस्ट विमानतळ होणार नाही, अशी ग्वाही दिली. सरकार दाबोळी विमानतळाबाबत जागृक असून, ते कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे त्यांनी आश्वसत केले.

सकाळी वेळेच्या कारणामुळे दाबोळीवरुन थोड्य़ा फ्लाईट मोपावर डायव्हर्ट झाल्या असतील, असेही सावंत म्हणाले. दाबोळीवरील युझर डेव्हलपमेंट फी आणि पार्किंग फी कमी करण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार असल्याचे सावंत म्हणाले.

व्हिसा ऑन अरायव्हलसाठी परराष्ट्र खात्याकडे चर्चा करण्याचे आश्वासन सावंत यांनी यावेळी दिले. येत्या काळात कोल्हापूर आणि बेळगाव सारख्या ठिकाणांवरुन देखील कनेक्टीव्हिटी वाढणार असल्याचे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT