Dabolim funnel zone  Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport : दाबोळीत फनेल झोनमधील घर पाडले; अन्य 10 घरांवर टांगती तलवार

मोठ्या पोलिस बंदोबस्तात चिखली पंचायतीचे सचिव व इतर संबंधीत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घर पाडण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

Dabolim funnel zone illegal construction : दाबोळी येथे फनेल झोनचे उल्लंघन करून बांधलेले एक घर आज मोठ्या पोलिस बंदोबस्तात चिखली पंचायतीचे सचिव व इतर संबंधीत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाडण्यात आले. फनेल झोनमध्ये असलेल्या इतर 10 घरांच्या रहिवाशांच्या मनात चिंता निर्माण झाली असून त्यांच्यावरही टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दाबोळी भागात विमानांचे लॅडींग होत असलेला परीसर हा फनेल झोन म्हणून घोषित करण्यात आला असून या परीसरात विमानांच्या लॅण्डीग वेळ एखादी घटना घडली तर मोठा हाहाकार माजेल. त्यासाठी या परिसरात एखादे घर किंवा इमारत बांधणेही धोक्याचे आहे. त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून हा परीसर फनेल झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान 15 वर्षांपूर्वी या फनेल झोन परिसरातील जागा कागदपत्रव्यवहार करून विकण्यात आली. त्यानुसार याठीकाणी आता 11 घरे उभी आहेत. दोन वर्षापूर्वी गट विकास अधिकाऱ्यांमार्फत पंचायतीने या घरांना नोटीस काढून घरे खाली करण्याचा आदेश देण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी या 11 घरांपैकी 10 घरमालकांनी न्यायालयात धाव घेऊन जैसे थे आदेश आणला. त्यानुसार या घरमालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आज पाडण्यात आलेल्या घर मालकाने न्यायालयात धाव घेतली न्हवती. त्याच्या घरावर आज बुलडोझर फिरवून घर जमिनदोस्त केले.

दरम्यान 11 पैकी एका घरावर बुलडोझर फिरवल्याने उर्वरीत 10 घर मालकांवर टांगती तलवार उभी राहीली आहे. आपण 15 वर्षांपूर्वी सदर जागा विकत घेतली असून त्यावेळी जमीन मालकाने जमीन विकताना आम्हाला फनेल झोन विषयी कोणतीच कल्पना दिली नव्हती, तसेच घर बांधतेवेळी नौदलाने सुद्धा कोणतीच सुचना आम्हाला दिली नाहीत. असे असते तर आम्ही याठीकाणी घरे बांधलीच नसती असे येथील रहिवाशांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT