Dabolim Airport Free WIFI Issue Dainik Gomantak
गोवा

कसला डिजिटल इंडिया? दाबोळीवरील फ्री वायफाय बिनकामाचे; प्रवाशाचे ते ट्विट अन् विमानतळाने शेअर केले पेड प्लॅन

दाबोळी विमानतळावरील फ्री वायफायबाबत एका प्रवाशाने प्रश्न उपस्थित केले आहेत.

Pramod Yadav

Dabolim Airport Free WIFI Issue: दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ गोव्यातील पहिले आणि महत्वाचे विमानतळ आहे. दाबोळीवरून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत असते. विमानतळावरील फ्री वायफायबाबत एका प्रवाशाने प्रश्न उपस्थित केले आहेत. येथील वायफाय बिनकामाचे असून, कसला डिजिटल इंडिया असेही या प्रवाशाने म्हटले आहे.

गोव्यातील दाबोळी विमानतळावरील वायफाय सुविधा बिनकामाची आहे. तेथे हायस्पीड डेटा विकत घेण्याची देखील सोय नाही. वोडाफोन आयडिया व्यवस्थित काम करत नाही, पाच मिनिटात फ्री लिमिट समाप्त झाले असे दाखवते. डेटा विकत घेण्यासाठी मी पैसे देऊ शकत नाही, कसला डिजिटल इंडिया?

दाबोळी विमानतळावरील वायफाय मोफत असून, 45 मिनिटांसाठी 500 एमबी डेटा मोफत मिळतो. स्पीड टेस्ट घेतली असून त्याचे स्क्रिनशॉट जोडले आहेत. तसेच, डेटा विकत घेण्यासाठी लिंक जोडली आहे.

दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने जोडलेल्या स्क्रिनशॉटच्या माहितीनुसार, यात दोन तासांसाठी 25 रूपये तर एक जीबी डेटासाठी 10 रूपये असे पॅक असल्याचे त्यांनी दिलेल्या माहितीवरून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT