Airport Dainik Gomantak
गोवा

वर्षभरात पुर्ण होणार दाबोळी विमानतळाचे काम ; गगन मलिक

पुढील वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

दाबोळी : भारतीय विमानतळ (Airport) प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आलेला दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 256 कोटींच्या विस्तार प्रकल्पाचे काम पुढील वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी स्पष्ट केले.

सध्या दाबोळी (Dabolim) विमानतळ प्रकल्प सुमारे 64 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा आहे, त्यामध्ये आता अतिरिक्त 18 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या विस्तारित प्रकल्पाची भर पडणार आहे. जून महिन्यामध्ये संचालक गगन मलिक यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता.

या प्रकल्पाचे बांधकाम सध्या वेगात सुरू आहे. यापूर्वी नव्याने उभारण्यात आलेल्या दाबोळी विमानतळ इमारतीसाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर विनावापर असलेल्या जुन्या इमारतीच्या जमिनीचा वापर विमानतळावरील साधनसुविधा वाढविण्यासाठी करण्यातयेत आहे. दाबोळी विमानतळावरून ये-जा करणाऱ्या देशी, विदेशी प्रवाशांना योग्य साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दाबोळी विमानतळ प्राधिकरण प्रयत्नशील असल्याचे मलिक यांनी सांगितले.

प्रवाशांना साधनसुविधा उपलब्ध करून देताना विमानतळाच्या सौंदर्यी करणाचेही काम पूर्ण करण्यात आले आहे. दाबोळी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीमध्ये काही बदल करून 15 हजार चौरस मीटर जागेत एबी 321 व बी 737 या प्रकारची दोन विमाने सामावून घेण्याची सुविधा करण्यात आली आहे. नवीन विस्तार प्रकल्प बेसमेंटसह तीन मजल्यांचा आहे.

यानवीन प्रकल्पामुळे प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढणार आहे. सध्या 7.65 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे ती सुमारे 13 दशलक्षपर्यंतजाण्याची शक्यता आहे. आता दरताशी 500 प्रवासी हाताळण्यात येतात. प्रकल्पाच्या विस्तारीकरणानंतर ती संख्या सुमारे 3250 वर जाईल.

दाबोळी विमानतळाच्या विस्तारित प्रकल्पात 96 चेक इन काऊंटर्स, पुरुष, महिला व अपंग व्यक्तींसाठी वॉशरूम, बॅगेज कन्व्हेयर बेल्टस्, सेग्रीगेशन रेलिंग, एअरलाईन्ससाठी बॅकअप कार्यालये, वेगिंग मिशन्स, फायर डिटेक्शन अलार्म, प्रोटेक्शन सिस्टमसह फायर कंट्रोल रूम, विविध स्टोअर्स, सीसीटीव्ही, दोन नवीन प्रवाशी बोर्डिंग ब्रीज व इतर सुविधा असतील, असे संचालक गगन मलिक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT