Dabholim Flyover Construction Accident Bike Rider Killed
वास्को: दाबोळी येथे मंगळवार (4 मार्च) दुचाकीचालक स्वप्नील चिंदरकर याच्या अंगावर अवजड बॅरिकेड्स पडून तो जागीच मरण पावल्याप्रकरणी मुरगाव गट काँग्रेस समितीने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, असे निवेदन वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांना गुरुवारी (6 मार्च) दिले.
दाबोळी (Dabholim) येथे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या पुलाचे खांब उभारण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. त्या ठिकाणी अवजड लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यापैकी एक बॅरिकेड स्वप्नील चिंदरकर याच्या दुचाकीवर पडून तो त्याखाली दबला गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. चिंदरकर हा वीज खात्याचा कामगार होता. याप्रकरणी दखल घेताना मुरगाव गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष शरद चोपडेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. पीटर डिसोझा, हनीप शेख, स्टॅन्ली वाझ, सतीश अमेरकर, वेनिका आरोलकर, प्रणिता खोर्जुवेकर, लक्काप्पा दोडामणी, बेनादिन्हो वेल्हो, कमल जैस्वाल आदी यावेळी उपस्थित होते.
उड्डाणपुलाचे बांधकाम करताना तेथे आवश्यक खबरदारी न घेता कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची गरज असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.