Cylinder blast Dainik Gomantak
गोवा

Cylinder blast: पिकेन,हणजूण येथे सिलिंडर स्फोट; एक ठार, एक गंभीर जखमी

रेस्टॉरंटमध्ये झाला स्फोट

दैनिक गोमन्तक

पिकेन, हणजूण येथील एका रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला असून यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रेस्टॉरंट मालक रेश्मा वसईकर या गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

(Cylinder blast at Anjuna one dead on the spot one seriously injured)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिकेन, हणजूण येथे एका रेस्टॉरंटमध्ये सिलेंडर गॅस गळतीने स्फोट झाला आहे. यात डेन्सन डिसोझा (42, रा. म्हापसा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रेस्टॉरंट मालक रेश्मा उसकईकर (39) या जखमी झाल्या आहेत. या स्फोटाचे हादरे दूरपर्यंत जाणवले असल्याचे काही स्थानिकांनी माहिती दिली आहे.

ही घटना नेमकी कशामुळे झाली आहे ? यात आणखी काही नागरिक जखमी झाले आहेत का? याची माहिती मिळाली नसली तरी या घटनेतील जखमी रेस्टॉरंट मालक रेश्मा वसईकर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु केले असुन त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

तसेच या घटनेत जागीच ठार झालेले डेन्सन डिसोझा यांच्या अंगावर सिलेंडर जोराने आदळले असल्याने यात त्यांचा मृत्यू झाला आहे. डिसोझा यांचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात दाखल शव-विच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT