Aleixo Sequeira|Cutbona Cholera Cases Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: 'ते' अजूनही 'कुटबण' स्वच्छतेत सामील होऊ शकतात! मंत्री सिक्वेरांचे आमदार सिल्वांना आवाहन

Aleixo Sequeira: वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांच्याबद्दल आपल्याला आदर, त्यांच्याबद्दल आपल्या मनात कसलाही आकस नाही; सिक्वेरांचे स्पष्टीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Cutbona Mobor Cholera Cases

सासष्टी: वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा (Cruz Silva) यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कसलाही आकस नाही किंवा द्वेष नाही. कुटबण जेटी ही त्यांच्या मतदारसंघात येते व या जेटीच्या स्वच्छता कामात सामील व्हायला त्याला कोणीही अडवलेले नाही, असे स्पष्टीकरण पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.

ते म्हणाले की, जेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जेटीवर गेले तेव्हा ते आमच्यासोबत होते. तिथेच दक्षिण गोवा जिल्हा कार्यलयातील बैठक निश्‍चित झाली होती. आपल्या शेजारी त्यांच्यासाठी खुर्चीही ठेवली होती. मात्र ते बैठकीला उशिरा आले.

त्यानंतर जेटीच्या पाहणी बद्दलचा अहवाल सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला होता. जर त्यांना जेटी स्वच्छतेबद्दल एवढी तन्मयता होती तर त्यानी तिथे यायला हवे होते. आपल्याला वाटले त्यांना यात रस नाही त्यामुळे नंतर त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला नाही. ते अजूनही जेटी स्वच्छता कामात सामील होऊ शकतात, असे मंत्री सिक्वेरा म्हणाले.

जेटीसंबंधी काम पूर्णत्वाकडे!

मुख्यमंत्र्यांनी भेटीच्या वेळी कुटबण जेटी संदर्भात अनेक निर्देश दिले होते. व हे सर्व पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली होती. तेव्हा ठरवलेले होते ते काम पूर्णत्वाकडे गेले आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री सिक्वेरा यांनी पत्रकारांना दिली.

नवीन जेटी बिनकामाची; बोट मालकांचे मत

नवीन जेटीचे उदघाटन ३० सप्टेंबर पर्यंत केले जाण्याची शक्यता असलयाचे कुटबण बोट मालक संघटनेने सचिव पॅट्रिक डिसिल्वा यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र ही जेटी सुरु केली तरी आमच्यासाठी ती बिन कामाची आहे. तिथे आमची वाहने नेण्यासाठी रुंद रस्ता नाही. तेव्हा मासळी लोडिंग व अनलोडिंग करताना भयंकर त्रास होणार आहे,असेही ते म्हणाले.पण मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळी जे काही ठरविण्यात आले होते ते ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. स्वच्छतेचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचे डिसिल्वा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT