Aleixo Sequeira|Cutbona Mobor Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: 'कुटबण'ची जबाबदारी आता पर्यावरण मंत्र्यांच्या खांद्यावर; पुन्हा होणार सर्वेक्षण

Aleixo Sequeira: मुख्यमंत्र्यांच्या सूचना अंमलात आणायची जबाबदारी आपल्यावर टाकली आहे; पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा

गोमन्तक डिजिटल टीम

Cutbona Jetty Cholera Cases

सासष्टी: मुख्यमंत्र्यांनी कुटबण जेटी पाहिली व ते हैराण झाले. कुटबण जेटी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केल्या आहेत व या सूचना अंमलात आणायची जबाबदारी आपल्यावर टाकली आहे. सासष्टीतील एकमेव मंत्री तसेच आपल्याला कुटबण जेटी जवळ असल्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर ही जबाबदारी टाकली असावी.

सर्व संबंधितांची बैठक बोलावून जेटीवरील उपाययोजनांचा आढावा घेतला व पुन्हा एकदा कुटबण जेटीवर जाऊन प्रत्यक्ष पहाणी व सर्वेक्षण केले जाईल, असे पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी पत्रकारांना सांगितले.

ही जबाबदारी पार पाडताना संबंधितांच्या अनेक बैठका घ्याव्या लागतात व त्यासाठी या दिवसांत आपण अनेक बैठका घेत आहे. वस्तुस्थिती पाहिली तर जे काम व्हायला पाहिजे ते गतीने होत नाही. तरी बोट मालक व मच्छिमारांनी सफाईचे काम स्वतःहून सुरू केले आहे ही चांगली गोष्ट आहे. असेही सिक्वेरा यानी सांगितले. कॉलरासंबंधी सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात केवळ एक व ‘गोमेकॉ’त सहा कॉलरा रुग्ण उपचार घेताहेत,असेही ते म्हणाले.

भाजप सदस्य वाढीचा प्रयत्न!

नुवे मतदारसंघातील भाजप सदस्य नोंदणी मोहिमेसंदर्भात बोलताना सिक्वेरा यांनी सांगितले की, आपण अमुक इतकेच सदस्य करणार, असे कोणतेही बंधन घातलेले नाही. ज्यांना इच्छा आहे त्यांनी भाजपचे सदस्य व्हावे. मात्र जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचा आपला प्रयत्न आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 28 August: जुने वाद संपतील, प्रॉपर्टी ताब्यात येईल; कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या..

TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

SCROLL FOR NEXT