Chief Minister Sawant Dainik Gomantak
गोवा

कस्टोडीयन प्रश्न निकालात काढण्यासाठी प्रयत्न करणार- मुख्यमंत्री सावंत

पुढील सनदीसाठी आता डिचोली (Bicholim) जिल्हाधिकारी कार्यालयात सोय केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत (Chief Minister Sawant) यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मयेतील (Maye) स्थलांतरीत मालमत्तेचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. यापुढे मयेच्या जनतेला सनदी मिळविण्यासाठी कोणताही एक दस्ताऐवज आणि ज्यांनी अजुनही सनदींसाठी अर्ज केलेले नाही त्या उर्वरित मयेवासीयांना अर्ज करण्यासाठी मुदत दिली जाईल. पुढील सनदीसाठी आता डिचोली (Bicholim) जिल्हाधिकारी कार्यालयात सोय केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत (Chief Minister Sawant) यांनी दिली.

मये गावासाठी सुमारे 4.20 कोटी रुपये खर्चून सहा किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन घालण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाममंत्री दिपक पाऊसकर,आमदार प्रवीण झांट्ये, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, सरपंच सिमा आरोंदेकर, मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर आदी मान्यवर उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर (Minister Deepak Pauskar) यांनी, आपल्या खात्यामार्फत मये मतदारसंघात विकासकामांना चालना देण्याचे आश्वासन दिले.

केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या "जल जिवन योजने" अंतर्गत मये गावात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली जाईल असे सांगितले.यावेळी मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते मये स्थलांतरित मालमत्तेतील शंभर घरमालकांना सनदी वितरित करण्यात आल्या. सरपंच सिमा आरोंदेकर यांनी स्वागत केले.सुत्रसंचालन विश्वास चोडणकर यांनी केले. तुळशीदास चोडणकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT