Land Grabbing Case
Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grab case : कुंक‌ळ्ळी जमीन हडप प्रकरण ‘एसआयटी’कडे सोपवणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

कुंक‌ळ्ळीत मोठ्या जमिनीची मालकी असलेल्या सोसिएदाद दी ॲग्रिकोला गावकारी डी कुंकोलिम ई वेरोडा सोसायटीने जमीन बळकावण्याचे प्रकरण एसआयटीकडे सोपविण्याचे ठरविले आहे.

यासंदर्भात कार्यकारिणी समितीने ठराव मंजूर केला. जमीन हडप करण्यात कोणाचा हात आहे याचा तपास करण्यासाठी, त्या दोषींना शिक्षा करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे विकलेल्या जमिनी परत घेण्यासाठी विशेष तपास पथकाकडे हे प्रकरण सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोसिएदाद दी ॲग्रिकोला कुंकोलिम ई वेरोडा यांच्याकडे कुंक‌ळ्ळीमध्ये प्रचंड जमीन आहे. सोसायटीच्या नियमानुसार व घटनेनुसार सोसायटी केवळ शेतीसाठी जमीन लिजवर देऊ शकते.

न्यायालयाने सध्याच्या समितीला जमीन लिजवर देण्यास निर्बंध घातल्यामुळे जमीन लिजवर देणेही शक्य नाही. एक वर्षाआधी सोसिएदादच्या अध्यक्षांनी सोसिएदादच्या जमिनीचे बेकायदेशीरपणे विक्रीपत्र करून गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे.

काही अज्ञात व्यक्तींनी सोसायटीची जमीन बेकायदेशीरपणे विकली आहे. भूमाफियांनी बेकायदेशीररीत्या विकलेल्या जमिनीचे अचूक क्षेत्र माहीत नाही; परंतु त्यांना काही विक्री करार मिळाले आहेत ज्यावरून असे दिसून येते की भूमाफियांनी बेकायदेशीरपणे विक्री करार केला आहे.

- शाबा देसाई, अध्यक्ष, सोसिएदाद दी ॲग्रिकोला कुंकोलिम ई वेरोडा

बेकायदेशीरपणे विक्री

या जमिनी बळकावण्याच्या घोटाळ्याच्या मुळाशी संस्था जाणार आहे. संस्थेने विक्री कराराच्या फाईल्स एसआयटीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असून विक्री कराराचा डेटा मिळवणार आहे. हजारो स्क्वेअर मीटर जमीन भूमाफियांनी बळकावली आहे आणि ती बेकायदेशीरपणे विकली आहे, असे सोसिएदाद मॅनेजिंग कमिटीने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women In Goa Startup: देशापेक्षा गोव्याची सरासरी अधिक; स्टार्टअपमध्ये महिलांचा डंका

Goa News : ‘आमुरचंवर’ लेखसंग्रह ठरेल भावी पिढीसाठी मार्गदर्शक: मिनाक्षी मार्टिन्स

Chhattisgarh Accident: मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, पिकअपखाली चिरडून 15 मजुरांचा मृत्यू; 20 हून अधिक जखमी

Goa Today's Live News: आप बाणावलीची जिल्हा पंचायत निवडणूक लढणार - व्हेंझी

Viral Video: पट्ट्यानं अशी सर्जरी केली, तुम्हीही व्हिडिओ पाहून डोक्यावर माराल हात; म्हणाल, ‘’असला सनकी कधीच पाहिला नाही’’

SCROLL FOR NEXT