Mapusa News Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: खोर्ली-म्हापशातील साकव नादुरुस्त; नगरपालिकेकडून वाहतूक बंद

साकवावर खड्डा पडल्याने तो कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News खोर्ली येथील सारस्वत विद्यालय शाळेकडे जाणाऱ्या जुन्या साकवावर खड्डा पडल्याने तो कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जुना कल्व्हर्ट (साकव) म्हापसा पालिकेने वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला आहे.

म्हापसा येथील खोर्लीच्या विविध वाडीतील रहिवासी या कल्व्हर्टचा वापर करतात. हा कल्व्हर्ट सारस्वत विद्यालयाच्या दिशेने जात असल्याने विशेषतः सकाळ आणि दुपारच्या वेळी मोठी वर्दळ असते.

उपलब्ध माहितीनुसार, सुमारे चार ते पाच दशके जुना हा कल्व्हर्ट असून याच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे लॅटराइटचे दगड यापूर्वीच नाल्यात पडल्याने कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. नुकतीच म्हापसा नगरपालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली असता ही बाब निदर्शनास आली.

तर येथील ग्रामस्थ- संजय बर्डे म्हणाले, "जुन्या कल्व्हर्टची अवस्था बिकट असून साफसफाई करताना दगड पडल्याचे दिसून आले होते. तसेच 15 दिवसांपूर्वी पालिकेला कल्व्हर्टच्या खराब स्थितीची माहिती होती.

या घटनेची माहिती मिळताच म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके, नगरपालिकेचे अभियंते घटनास्थळी दाखल झाले व स्थितीचा आढावा घेतला.

स्थानिक नगरसेविका शुभांगी वायंगणकर यांनीही कल्व्हर्टची पाहणी केली. त्यानंतर दगड लावून सदर कल्व्हर्ट दोन्ही बाजूंनी अडवून रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

सारस्वत शाळेकडे जाणारा कल्व्हर्ट जुना काळातील असून त्याचा दगड नाल्यात पडल्याने आम्ही हा कल्व्हर्ट वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचे नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, संजय बर्डे यांच्या घरासमोरील रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून चारचाकी वाहनांची वाहतूक सर्व रहिवासी व सारस्वत शाळेतील विद्यार्थ्यांना कमलेश्वर गॅरेजकडून व नंतर गणेश मंदिराकडून विद्यानगरमार्गे वळवण्यात येईल. तर गोवेकर बेकरीसमोरून दुचाकी वाहने जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT