Dangerous  Canva
गोवा

Saleri Bridge: साळेरी पूलाचे लोखंडी गज बाहेर! दुर्घटना घडण्याची भीती

Saleri News: आगोंद व खोला या दोन गावांना जोडणाऱ्या साळेरी येथील मुख्य रस्त्यावरील पुलाच्या खालील भागातील सिमेंट पडून लोखंडी गज बाहेर पडले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Dangerous Saleri Bridge

आगोंद: आगोंद व खोला या दोन गावांना जोडणाऱ्या साळेरी येथील मुख्य रस्त्यावरील पुलाच्या खालील भागातील सिमेंट पडून लोखंडी गज बाहेर पडले आहेत. त्‍यामुळे या ठिकाणी कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

माजी मुख्यमंत्री स्व. शशिकला काकोडकर यांच्या हस्ते १९७५ साली या पुलाचे उद्‍घाटन करण्यात आले होते. त्यानंतर साधारणपणे १३ वर्षांपूर्वी माजी आमदार विजय पै खोत यांच्या कार्यकाळात या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती, असे स्थानिक समाज कार्यकर्ते सुनील पागी यासंबंधी सांगितले.

या पुलावरून सतत वाहनांची वर्दळ चालू असते. काणकोण ते मडगाव महामार्गावर काही अपघात किंवा अन्य कारणांमुळे वाहतूक बंद झाल्यावर या मार्गाने वाहतूक वळविली जाते. मोठी मालवाहू वाहने‌ या पुलावरूनच ये जा करत असतात.

सध्या या पुलाला मोठे तडे आलेले स्पष्ट दिसत असून या पुलाची तातडीने दुरुस्ती आवश्यक बनली आहे, असे विनोद फळदेसाई यांनी सांगितले.

अनुचित घटना घडण्यापूर्वीच या पुलाच्या सद्यस्थितीचे तज्ञांकडून निरिक्षण करून त्यावर उपाययोजना करणे‌ आवश्यक आहे, असे आगोंद स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष व अखिल गोमंतक मराठा समाज काणकोण शाखेचे अध्यक्ष किरण नाईक गावकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT