Sal Dam Dainik Gomantak
गोवा

Sal Dam : मॉन्सूनपूर्व विकेंडला साळ बंधाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

आबालवृद्धांची झुंबड : शीतल गारवा अनुभवण्यासाठी लोक पाणवठ्यांकडे

दैनिक गोमन्तक डिजिटल

मॉन्सून उंबरठ्यावर आलाय, तरी शापोरा नदीवरील साळ बंधाऱ्यावर अजूनही पर्यटकांचा गजबजाट दिसून येत आहे. रविवारी मॉन्सूनपूर्व विकेंडला तर हा बंधारा पर्यटकांच्या गर्दीने फुलला होता. पर्यटकांसह गोमंतकीयांनीही विकेंडची मजा लुटताना बंधाऱ्यातील शीतल पाण्याचा गारवा अनुभवला.

मोसमी पाऊस सक्रिय होईपर्यंत तरी या बंधाऱ्यावर पर्यटकांचा वावर कायम असणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

गेल्या दहा-बारा वर्षांपासून प्रकाशझोतात आलेला आणि उन्हाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला शापोरा नदीवरील साळ बंधारा काही काळापूर्वी गैरप्रकारांमुळे वादाचा विषय बनला होता. या बंधाऱ्यावरील या गैरप्रकारांवर नियंत्रणही ठेवण्यात आले होते. मात्र, साळ येथील या बंधाऱ्यावर पुन्हा एकदा पर्यटकांचा गजबजाट जाणवू लागला आहे.

‘कोविड’नंतर पर्यटकांत वाढ

यंदा हवामानात कमालीचा बदल होतानाच उष्णतेने कहर केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची पावले या बंधाऱ्याकडे वळत आहेत. रविवारी तसेच सुटीच्या दिवशी तर येथे पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. कोविड महामारीनंतर गेल्या वर्षीपासून पर्यटक उन्हाळी पर्यटनासाठी या बंधाऱ्यावर मोठ्या संख्येने येत आहेत.

गोमंतकीयांचीही उपस्थिती

पुढील दोन दिवसांत म्हणजेच सात जूनपासून मॉन्सूनला सुरुवात होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. पाऊस कोणत्याही क्षणी सक्रिय होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनपूर्व शेवटचा रविवार अर्थातच विकेंड असल्याने आज साळ बंधारा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता. दक्षिण गोव्यातील विविध भागांतून पर्यटक कुटुंबासह साळ बंधाऱ्यावर आले होते. राज्याबाहेरील पर्यटकही आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT