Crocodile In Velsao Goa  Dainik Gomantak, Canava
गोवा

Crocodile In Velsao: 'ती' मगर सापडली पिंजऱ्यात

Goa Forest Department: वेळसाव ग्रामस्थांत समाधान

गोमन्तक डिजिटल टीम

वेळसाव येथील ‘त्या’ मगरीला पकडण्यास अखेर वन विभागाला यश आले. मगर वन विभागाच्या पिंजऱ्यात सापडल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

वेळसाव येथे तळेवजा शेतात गुरुवारी मगरीचे दर्शन झाल्याने येथील नागरिकांत तसेच शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले होते. मगरीला पकडण्यासाठी वन विभागाला कळविले. नंतर वन विभागाच्या पथकाने त्या शेतवजा तळ्याच्या मध्यभागी पिंजरा लावला.

दरम्यान, शुक्रवारी (ता.२८) सकाळी गावकऱ्यांनी तेथे येऊन बघितले असता मगर त्या पिंजऱ्यात कैद झालेली दिसली. याची माहिती वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली व त्यांनी मगर कैद झालेला पिंजरा वर आणला. याची माहिती आमदार आतोन वाझ यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

खरी कुजबूज: मुख्यमंत्री पाठीराखे

गृहमंत्री अमित शहा घाबरले, संसदेत येण्याचे धैर्य त्यांच्यात नाही; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची टीका

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी; स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, सन्मानावर विशेष भर

SCROLL FOR NEXT