Crocodile Caught in Baina Dainik Gomantak
गोवा

Crocodile in Baina: बायणामध्ये लोकवस्तीत मगरीचा संचार; सापळा रचत वन अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात

काही दिवसांपूर्वी इथले स्थानिक चंदन गड यांना जवळच्या तलावात मगर दिसली होती.

Kavya Powar

Crocodile Caught in Baina: मागील काही महिन्यांमध्ये लोकवस्तीत मगरींचा संचार वाढला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बायणामध्येही अशीच एक घटना समोर आली आहे.

वनविभागाने बायणा रहिवासी भागात फिरणाऱ्या मगरीला पकडले. काही दिवसांपूर्वी इथले स्थानिक चंदन गड यांना जवळच्या तलावात मगर दिसली होती. त्यानंतर त्यांनी वनविभागाकडे सापळा लावण्यासाठी मागणीही केली होती.

मात्र सापळा लावूनही मगर पकडली गेली नव्हती. दरम्यान आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास मगर तलावातून बाहेर आली. मगर दिसताच चंदन यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला पकडले.

दरम्यान, शिरसईमध्येही नागरिकांना मगरीचे दर्शन झाले आहे. गणपती विसर्जनस्थळी मगरीचे पिल्लू खुलेपणाने फिरताना आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

याबाबत स्थानिकांनी एक व्हिडिओ चित्रित केला असून, शिरसई येथील लोकांनी विशेष काळजी घेण्याचे आवहन करण्यात आले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT