rajeev kadm.jpg
rajeev kadm.jpg 
गोवा

गुन्हेगारी वकील राजीव गोम्स यांचे कोविड-19 ने निधन 

दैनिक गोमंतक

मडगाव : प्रख्यात गुन्हेगारी वकील राजीव गोम्स यांचे बुधवारी सायंकाळी कोविद-19 मुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर मडगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  ते 46 वर्षांचे होते. गोम्स याच्या आकस्मिक निधनानंतर न्यायालयीन क्षेत्रामधून हळहळ व्यक्त करण्यात येत असून न्यायालयीन क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.  तर प्रख्यात गोवा कायदेतज्ज्ञ राजीव गोम्स यांचे निधन झाल्याने  मन दु: खी झाले, अशी खंत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. (Criminal lawyer Rajiv Gomes dies at covid-19) 

तर, एनआरआय कामकाज आयुक्त आणि भाजपा सरचिटणीस नरेंद्र सवाईकर यांनीदेखील राजीव गोम्स यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. '' माझे आदरणीय सहकारी अ‍ॅड. राजीव गोम्स यांचे निधन झाले.  त्यांच्या जण्याने कायदेशीर वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे, 'अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.  राजीव गोम्स बर्‍याच तरूण वकिलांचे सल्लागार होते. त्यांच्या निधनाने एक खोल पोकळी निर्माण झाली,   “बरं, आता आम्ही कोणाकडे जयाच? तुमच्या सोबत घालवलेला प्रत्येक वेळ आम्हाला आठवेल, ” अशी पोस्ट तरुण वकील हृषीकेश कदम यांनी फेसबुकवर केली आहे.    

दरम्यान, राजीव गोम्स यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर बलात्कार प्रकरणात तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांचे प्रतिनिधित्व केले होते. येत्या बुधवारी (ता. 19) पर्यंत या प्रकरणाची  अंतिम निकालाची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

मडगावमधील रामनाथ कारे कायदा महाविद्यालयातून त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. गेल्या वीस वर्षांपासून ते या क्षेत्रात होते. गोम्स यांच्या जाण्याने न्यायालयीन क्षेत्रात पोकळ निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.  दक्षिण गोवा वकील संघटनेचे ते माजी अध्यक्ष असून त्यांच्या हाताखाली अनेक कनिष्ठ वकील प्रशिक्षण  घेत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT