Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Accident Goa: बाणस्तारी अपघाताचा 10 महिन्यांनंतर तपास पूर्ण, तिघांवर आरोप निश्‍चित

Banastarim Accident Goa: तपासकामातील दस्तावेजाची पडताळणी करून क्राईम ब्रँचच्या अधीक्षकांना आरोपपत्र दाखल करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Accident Goa

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बाणस्तारी पुलावर झालेल्या भीषण अपघात प्रकरणाचा तपास तब्बल १० महिन्यांनंतर क्राईम ब्रँचने पूर्ण केला आहे. कायदा विभागाच्या सल्ल्यानुसार दोन आठवड्यांनंतर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे.

अपघातग्रस्त मर्सिडीज कारचालक संशयित श्रीपाद ऊर्फ परेश सिनाई सावर्डेकर याच्यासह तिघांविरुद्ध हे आरोपपत्र ठेवले जाणार आहे. त्यामध्ये सुमारे २५ हून अधिक साक्षीदार आहेत. या अपघातातील संशयित हायप्रोफाईल असल्याने पोलिसांकडून हे आरोपपत्र सादर करण्यास विलंब झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या अपघातात दोन दुचाकींवरील तिघाजणांचा मृत्यू झाला होता, तर सहाजण गंभीर जखमी झाले होते. कारचालक परेश हा हायप्राफाईल उद्योजक असल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न झाला होता. म्हार्दोळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केल्यानंतर दिवाडीतील दुचाकीवरील जोडपे मृत्युमुखी पडल्याने हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे देण्याची मागणी स्थानिकांनी केल्याने ते प्रकरण वर्ग केले होते.

सरकारी वकिलांकडे सल्ला महत्त्वपूर्ण

क्राईम ब्रँचने ॲड. अमित पालेकर आणि गणेश लमाणी यांचे मोबाईल सीडीआर (कॉल डिटेल्स रिपोर्ट) माहिती मिळविण्यासाठी जप्त केले होते. तसेच कारच्या स्टेअरिंगवरील हाताच्या बोटांचे ठसे आणि वाहनाचा अपघातावेळचा वेग यांचे अहवाल क्राईम ब्रँचकडे पोहोचले आहेत.

तपासकामातील दस्तावेजाची पडताळणी करून क्राईम ब्रँचच्या अधीक्षकांना आरोपपत्र दाखल करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. यात काही त्रुटी राहू नयेत, यासाठी कायदेशीर सल्ल्यासाठी सरकारी वकिलांकडे आरोपपत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तिघांवर आरोप निश्‍चित

क्राईम ब्रँचच्या तपासकामातून कारचालक परेश याला वाचविण्यासाठी बोगस चालकाला पुढे करून कटकारस्थान व पुरावा नष्ट करण्यात एका वकिलाचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले होते.

त्यामुळे क्राईम ब्रँचने चालक गणेश लमाणी याला अटक केल्यानंतर ॲड. अमित पालेकर यांचे नाव समोर आले होते. चौकशीनंतर त्यांनाही अटक केली होती. त्यामुळे हे आरोपपत्र संशयित परेश सावर्डेकर याच्यासह गणेश लमाणी आणि ॲड. अमित पालेकर यांच्यावर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT