Goa Court: Dainik Gomantak
गोवा

Comunidade: थिवी कोमुनिदादच्या माजी ॲटर्नीवर गुन्हा

Comunidade: गैरव्यवहार : न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई

दैनिक गोमन्तक

Comunidade:

थिवी कोमुनिदादमधील गैरव्यवहारप्रकरणी माजी ॲटर्नीविरोधात विश्‍वासघात केल्याच्या आरोपाखाली (भादंसं कलम ४०८) कोलवाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डग्लस सिक्वेरा यांनी दिलेली तक्रार कोलवाळ पोलिसांनी नोंदवून न घेतल्याने डिचोली प्रथमश्रेणी न्यायालयाने ती 30 दिवसांच्या आत दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे.

माडेल-थिवी येथील डग्लस सिक्वेरा यांंच्यासह इतरांनी थिवी कोमुनिदादमध्ये झालेल्या 15.50 लाखांच्या घोटाळाप्रकरणी 5 डिसेंबर 2022 रोजी कोमुनिदादचे माजी ॲटर्नी साविओ परेरा यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती.

कोमुनिदाद जमिनीच्या सर्व्हे क्रमांक 346/1 मधून वाट काढण्यासाठी केथ लुईस आणि गेर्ते लुईस यांना परेरा यांनी ना हरकत दाखला दिला होता. मात्र, त्यासाठी आवश्‍यक असलेली प्रक्रिया केली नव्हती. हा ना हरकत दाखला देण्यापूर्वी सरकारची संमती घेतली नव्हती.

त्यासाठी लुईस यांच्याकडून घेतलेली १५.५० लाखांची रक्कम कोमुनिदादच्या खात्यामध्ये जमा केली नव्हती तसेच कोमुनिदादच्या बैठकीतही ती उघड केली नव्हती. त्यांनी ही रक्कम स्वतःसाठी वापरली होती.

साविओ परेरा हे २०१९ मध्ये कोमुनिदादचे ॲटर्नी होते. त्यांना कोमुनिदादच्या सर्व दस्तावेजांची हाताळणी करण्यास परवानगी होती. त्याचा गैरफायदा घेत त्यांनी हा गैरव्यवहार केला, असे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी विनंती तक्रारीत करण्यात आली होती.

अध्यक्षांच्या सहीविनाच दाखले

कोमुनिदाद संहितेच्या कलम ५६ नुसार कोमुनिदादच्या अध्यक्षाला सरकारी अधिकारिणीशी व्यवहार करण्याचा अधिकार आहे. एखाद्याला ना हरकत दाखला दिल्यास त्याची नोंद कोमुनिदादच्या नोंदणीवहीत केली जात होती. मात्र, २०१६ साली साविओ परेरा हे ॲटर्नी झाल्यापासून ते अध्यक्ष व कारकुनाची सही ना हरकत दाखल्यावर न घेता दिले जात होते.

पुन्हा न्यायालयात जाणार : सिक्वेरा

कलम ४८ नुसार सर्वसाधारण बैठकीतील कामकाजाचा इतिवृत्तांत हा कारकुनाने लिहायचा असतो. मात्र तो स्वतः ॲटर्नीच लिहीत होते. त्यासाठी कारकुनाची संमती लागते, ती त्यांनी घेतलेली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी व्हावी. पोलिसांनी गुन्हा नोंद करताना संशयित साविओ परेरा याच्याविरुद्ध इतर आरोप ठेवलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा न्यायालयात जाणार असल्याची माहिती तक्रारदार डग्लस सिक्वेरा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT