Karmal Ghat  Dainik Gomantak
गोवा

Karmal Ghat : करमल घाटातील क्रॅश बॅरिअर्स झाले खराब; वाहनचालकांच्या जीवाला धोका

काणकोणमधील करमल घाट विभागातील क्रॅश बॅरिअर्सची स्थिती खराब झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Karmal Ghat : काणकोणमधील करमल घाट विभागातील क्रॅश बॅरिअर्सची स्थिती खराब झाली आहे. हे बॅरिअर्स एकतर तुटले आहेत किंवा अपघातांमुळे खराब झाले आहेत. त्यामुळे आता NH 66 वरील तीव्र उतार आणि तीक्ष्ण, अरुंद वळण असलेला रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

असे असतानाही दुरुस्तीचे काम झालेले नाही, असे श्रीस्थल पंचायतीचे माजी सरपंच प्रशांत देसाई यांनी सांगितले. नुकसान झालेले क्रॅश बॅरिअर्स हे वाहनचालकांसाठी धोकादायक बनले आहेत; कारण घाटावर वाहन चालवताना थोडीशी चूकही तरी गाडी दरीत जाऊ शकते. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

गेल्या चार ते सहा महिन्यांत क्रॅश बॅरिअर्स खराब झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विभागाने वन प्राधिकरणाला या भागात दुरुस्तीसाठी आवश्यक जमीन देण्याचे पत्र लिहिले आहे जेणेकरून संरक्षण/संधारण भिंत बांधता येईल. यामुळे त्यांना हा रस्ता दुरुस्त करता येईल आणि नवीन क्रॅश बॅरियर्स देखील उभारता येतील.

पाडी ते पोळे हा करमल घाट विभाग काणकोण पोलीस ठाण्यापासून पाच किलोमीटर आणि कुंकळ्ळी पोलीस ठाण्यापासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. या सगळ्यामुळे गेल्या नऊ महिन्यांत काणकोण बाजूला आठ ते दहा अपघात झाले आहेत.

यामुळे नागरिकांनी हे बॅरिअर्सलवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT