Goa Covid Updates: राज्यात कोविड यंत्रणा सज्ज Dainik Gomantak
गोवा

Goa Covid Updates: कोविड यंत्रणा सज्ज; इस्पितळांना पुरेसा प्राणवायू पुरवठा

कोविडप्रकरणी याचिकेत सरकारची खंडपीठाला माहिती

दैनिक गोमन्तक

Goa Covid Updates: राज्यातील कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेबाबत सरकारने काळजी घेऊन आवश्‍यक ती उपाययोजना केली आहे. सरकारी इस्पितळातील सर्व प्राणवायू प्रकल्प कार्यरत असून खाटांची पुरेशी उपलब्धता ठेवण्यात आली आहे. कोरोनासंदर्भातच्या (Corona) कृती दलाने केलेल्या शिफारशीनुसार सरकारने निर्बंध लादले आहेत, अशी माहिती प्रतित्रापत्राद्वारे सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर करण्यात आली. या याचिकेला जोडउत्तर देण्यासाठी याचिकादाराने वेळ मागितल्याने ही सुनावणी येत्या 1 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.

मागील सुनावणीवेळी याचिकादार दक्षिण गोवा (South Goa) ॲडव्होकेटस् असोसिएशनतर्फे ॲड. निखिल पै यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ वगळता इतर सरकारी इस्पितळातील प्राणवायू प्रकल्प कार्यरत नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर आज ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली असून एकही प्रकल्प बंद नाही. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व ते उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत व त्यासंदर्भातची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आली आहे.

कोरोना-19 (Covid-19) व्यवस्थापनाच्या तज्ज्ञ समितीने बैठकीत अनेक नव्याने सूचना केल्या होत्या. कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी तीव्र नसून ती सौम्य आहे, त्यामुळे संचारबंदीची आवश्‍यकता दिसत नाही. कोरोना पॉझिटिव्हीटीचे प्रमाण वाढले असले तरी सरकारने कडक निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी सूचना करण्यात आली होती. तिसऱ्या लाटेतील (Third Wave of Corona) बहुतेक रुग्ण हे श्‍वास घेण्यास अडचण होत असल्याचे होते. ही लाट तीव्र नसली तरी त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वतोपरी तयारी ठेवण्याची गरज आहे. मुबलक प्रमाणात प्राणवायू ठेवण्याची आवश्‍यकता आहे. प्राणवायूची सोय असलेल्या खाटा प्रत्येक सरकारी इस्पितळात ठेवल्या जाव्यात, अशा सूचना केंद्रीय मंत्रालयाने केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी केली जावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT