COVID-19 Goa Covid mortality rate in the state increased 15 times
COVID-19 Goa Covid mortality rate in the state increased 15 times 
गोवा

COVID-19 Goa: राज्याचा कोविड मृत्यूदर15 पटीने वाढला

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: कोविडने(COVID-19) गेल्या 12 दिवसांत 706 जणांचा बळी घेतला आहे. गेल्या वर्षी कोविडने 706 मृत्यू(death) होण्यास 174 दिवस लागले होते. याचा अर्थ या 12 दिवसात कोविडने दररोज सरासरी 59 जणांचा मृत्यू झाला आहे. आज कोविडमुळे 70 जणांनी प्राण गमावले.(COVID-19 Goa Covid mortality rate in the state increased 15 times)

राज्यात गेल्या वर्षी कोविडने पहिला मृत्यू 22 जून रोजी नोंदला गेला होता. त्यानंतर 13 डिसेंबरला मृत्यूची आकडेवारी 706 वर पोचली होती. गेल्यावर्षी या काळात दररोज सरासरी चार जणांचा मृत्यू कोविडमुळे होत होता. याचा अर्थ आता राज्याचा कोविड मृत्यूदर15 पटीने वाढला आहे. आरोग्य यंत्रणेने जारी केलेल्या माहितीच्या आधारे म्हणता येते, की कोविडच्या दुसऱ्या लाटेची सुरवात राज्यात 28 फेब्रुवारी रोजी झाली. त्यावेळी राज्यात कोविडने मृत्यू पावलेल्यांची संख्या 795 होती. आता 12 मे पर्यंत 10७९ जणांनी कोविडमुळे प्राण गमावले आहेत. या महिन्यात 9856 नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी 706 जणांनी कोविडमुळे प्राण गमावले आहेत. आज चाचणीच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण 41.2 टक्क्यांवर गेले आहे काल ते 36.7 टक्के म्हणजे या महिन्यातील निच्चांकी होते.

महत्त्वाचे म्हणजे कोरोना नियंत्रणासाठी राज्यात संचारबंदी असताना कोरोनावर उपचार घेणाऱ्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात मरत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या 1874 झाली आहे. 
आज दिवसभरामध्ये 6920 कोरोना नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये 2835 नवीन कोरोना संसर्गित सापडले. आज दिवसभरात कोरोनावर उपचार घेणाऱ्या 2840 व्यक्ती बऱ्या झाल्या. आजच्या दिवशी राज्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 32791 वर पोचली असून कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी  2 टक्के वाढून ती 72.74वर पोचली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News : भाजप सरकार धूळफेक करणारे : अमित पाटकर

Congress News : महिलांना देणार वर्षाला १ लाख! काँग्रेसचे आश्‍‍वासन

Bicholim News : चार वर्षानंतर मयेत होणार ‘रेड्या’ची जत्रा; भाविकांना दिलासा

Mapusa News : श्री देव बोडगेश्‍‍वर मंदिर पुन्हा लक्ष्य ; सिनेस्‍टाईल चोरी

Panaji News : श्रीपाद नाईक यांच्याकडून गोपाळ परब यांची विचारपूस

SCROLL FOR NEXT