Panaji News : श्रीपाद नाईक यांच्याकडून गोपाळ परब यांची विचारपूस

Panaji News : सचिन परब भाजपला जवळचे ः मानले समाज माध्यमांवर आभार
Shripad Naik
Shripad NaikDainik Gomantak

Panaji News :

पणजी, मांद्रेतील सचिन परब आता भाजपला जवळचे वाटू लागले आहेत. सचिन यांचे वडील गोपाळ हे अपघातात जखमी झाले आहेत.

त्यांची विचारपूस केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी केली. सचिन यांनी अद्याप कॉंग्रेसचा राजीनामा दिलेला नाही, पण आपण तो देणार आहे, असे त्यांनी यापूर्वीच ‘गोमन्तक’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

सचिन हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यांनीही ही बाब नाकारलेली नाही. मी आधी कॉंग्रेसचा राजीनामा देतो व सांगतो अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Shripad Naik
Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

या दरम्यानच अपघातात पाय जायबंदी झालेले सचिन यांचे वडील गोपाळ यांची श्रीपाद यांनी भेट घेऊन विचारपूस केली आहे. मांद्रे मतदारसंघात गोपाळ यांनी कॉंग्रेस रुजवली. सचिन यांची आई संगीता या राज्यमंत्री होत्या. कॉंग्रेसशी निष्ठावान कुटुंब म्हणून या कुटुंबाकडे पाहिले जात होते. त्यामुळे सचिन यांनी कॉंग्रेस सोडण्याचा घेतलेला निर्णय चर्चेचा ठरला आहे.

सचिन यांनी समाज माध्यमावर लिहिले आहे, परब कुटुंबीय श्रीपाद नाईक यांनी गोपाळ परब या प्रतिष्ठित समाजबांधवांच्या प्रकृतीची कृपादृष्टीने भेट घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितात. ते नुकताच अपघातात जखमी झाले आहेत. या आव्हानात्मक काळात श्रीपाद नाईक यांनी दिलेला दिलासा खूप कौतुकास्पद आहे. समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी समर्पणाचे उदाहरण यातून घालून दिले आहे. त्यांच्या दयाळूपणाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com