Sonali Phogat Murder Case Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case : संगवान आणि सुखविंदर सिंगला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सोनाली फोगट हत्या प्रकरणात संशयित सुधीर संगवान आणि सुखविंदर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case : सोनाली फोगट हत्या प्रकरणात संशयित सुधीर संगवान आणि सुखविंदर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोघांनाही म्हापसा कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. आज शनिवारी म्हापसा कोर्टात सोनाली फोगट प्रकरणी सुनावणी झाली, त्यावेळी कोर्टाने ही कोठडी वाढवली आहे.

हणजुण पोलिसांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाकडे संशयितांची 4 दिवसांसाठी कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने आरोपींना 2 दिवसांची कोठडी सुनावली होती. यानंतर गुरुवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींना पुन्हा कोर्टात हजर करत त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली. कोर्टाने ती मान्य करत आरोपींची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली होती. याप्रकरणी म्हापसा कोर्टात आज 10 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी झाली यावेळी दोन्ही आरोपींना कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाशी संलग्न असलेल्या कर्लीस रेस्टॉरंटचा चालक एडविन नुनिस यास म्हापसा अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये संशयितला कर्लीस रेस्टॉरंटमध्ये जाता येणार नाही, ही महत्त्वाची अट घातली आहे. त्याशिवाय परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाता येणार नाही व तपास कामात हस्तक्षेप करता येणार नाही या अटींचा समावेश आहे.

तसेच दत्तप्रसाद गावकर, रामदास मांद्रेकर व एडविन नुनिस यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, हा हणजूण पोलिसांनी केलेल्या मागणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

गोव्यातील कर्लिस क्लबला सुप्रीम कोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. अवैध बांधकाम तोडण्याच्या किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हणजूण येथील कर्लिस बीच शॅक क्लब जमीनदोस्त करण्याचा गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेला आदेश राष्ट्रीय हरित लवादाने उचलून धरला होता. यानंतर आज उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी त्वरित कारवाईस सुरुवात करून सकाळी साडेसात वाजल्यापासून हा क्लब पाडण्याचे काम पोलीस संरक्षणात सुरू झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT