hc mumbai
hc mumbai  
गोवा

तारीक बाटलू याचे निर्दोषत्व कायम

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी:पोलिसांचा आव्हान अर्ज गोवा खंडपीठाने फेटाळला
गोवा पोलिसांनी पंधरा वर्षांपूर्वी अतिरेकी म्हणून काश्‍मीरच्या तारीक अहमद बाटलू याला अटक केली.
मात्र, पुराव्याअभावी सत्र न्यायालयाने त्याला निर्दोष ठरविले होते.त्याला पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते.पोलिसांनी निर्दोषत्वाला आव्हान दिलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून सत्र न्यायालयाचा निवाडा ग्राह्य ठरविला आहे.निर्दोषत्व रद्द करून शिक्षा देण्याइतपत पुरावे नसल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आहे.
मडगाव सत्र न्यायालयाने १० जुलै २००८ रोजी अतिरेकीचा आरोप असलेल्या तारीक बाटलू याची निर्दोष सुटका केली होती.त्यानंतर २००९ मध्ये गोवा पोलिसांनी त्याला गोवा खंडपीठात आव्हान दिले.खंडपीठाने बाटलू याला नोटीस बजावली ती त्याच्या मूळ गावी पोलिसांनी पोहचवली.मात्र त्या गावीच तो सुटका झाल्यानंतर न परतल्याने त्याच्या कुटुंबियाने ती घेतली नाही. वारंवार प्रयत्न करूनही
त्याचाच ठावठिकाणाच पोलिसांना लागला नाही.त्यामुळे गोवा खंडपीठाने या अर्जावरील सुनावणीवेळी बाटलू याची बाजू लढविण्यास
मोफत कायदा सेवेतून ॲड. जॉन लोबो यांची नियुक्ती केली व ही सुनावणी घेण्यात आली.सत्र न्यायालयाने दिलेल्या निवाड्यातील निरीक्षणे तसेच पोलिसांकडून तपासकामात राहिलेल्या त्रुटी यावेळी ॲड. लोबो यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत बाटलू याच्याविरुद्ध पोलिसांचे आरोप सिद्ध होत नाहीत असा युक्तिवाद मांडला.सरकारतर्फे एस. रिवणकर यांनी बाजू मांडली.तारीक बाटलू याला गोवा पोलिसांनी मडगाव येथील रेल्वे स्थानकावर स्फोटकांसह अटक केली होती.त्यामध्ये आरडीएक्स, ग्रेनेडस् तसेच डेटोनेटर्स सापडले होते. तो मंगला एक्स्प्रेस रेल्वेने ही स्फोटके घेऊन गोव्यात
प्रवास करत होता. मडगाव येथे तो उतरला असता गोवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.पंच व साक्षीदार पंचनामा करताना घेण्यात आले होते त्यामुळे ही स्फोटके तो गोव्यात आला होता हे सिद्ध होते.
दरम्यान, तारिक बाटलू यांनी सक्ष न्यायालयातील खटला सुनावणीवेळी त्याने स्वतःच साक्षीदारांची उलटतपासणी केली होती.त्यावेळी त्याने पोलिसांच्या खोट्या पंचनाम्याचा पर्दाफाश केला होता. १० मार्च २००६ रोजी नव्हे तर ३ मार्च २००६ रोजी मडगावातील ग्रेस चर्च येथे क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले होते व त्यानंतर रेल्वेने प्रवास करत असल्याचे व स्फोटके सापडल्याचा दिखावा केला होता.पोलिसांनी पंचनाम्यात सीलबंद केलेल्या पाकिटावर पंचांच्या सह्याही नव्हत्या.त्यामुळे हा बनाव असल्याचे सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT